पोस्ट्स

जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर !

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर !              मुंबई ,  दि. १६ :- जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. या मिशनअंतर्गत ३८ हजार गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी २२ हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.             सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याविषयावर  मंत्री पाटील म्हणाले की ,  या योजना ३० वर्षांसाठीच्या कालावधीसाठी असून जेथे शक्य आहे तेथे या योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेच्या पायाभूत सुविधांच्या भांडवली किंमतीच्या १०  टक्के एवढी लोकवर्गणी गोळा करण्यात येते व ती ग्रामपंचायतीच्या खात्यात राहते. तर डोंगराळ / वन भागामध्ये व अनुसूचित जाती/ जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान पाच टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात येते. या लोकव

नासिकच्या मध्यवर्ती भागातउदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" !

इमेज
नासिकच्या मध्यवर्ती भागात उदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801       नाशिक ( प्रतिनिधी ) - नाशिक हे महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचा कोन असलेले शहर आहे. सर्वाधिक विकास होणाऱ्या या शहरात स्पर्धात्मक युगात उद्योजकांच्या प्रगतीला गती मिळणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अत्यंत मोक्याच्या जागी उद्योग - व्यवसाय असणे गरजेचे आहे. रुंग्टा बिल्डकॉनचा ' बिझनेस पॉईंट ' हा औद्योगिक प्रकल्प शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात उदयाला येत आहे. येथे आपल्या उद्योगाचा प्रारंभ करण्याकरिता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष आकर्षक सवलती देत आहोत. चेअरमन सेंडूराम रुंग्टा यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली.    रुंग्टा बिल्डकॉन गेली २५ वर्षे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात असून दर्जेदार बांधणी, पारदर्शक व्यवहार, वेळेवर ताबा ही वैशिष्ट्ये आहेत. आता उंटवाडी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात ' बिझनेस पॉईंट ' ही संपूर्ण व्यावसायिक इमारत उभी राहिली आहे. सिटीसेंटर मॉलजवळ असलेल्या या बिझनेस पॉईंटमध्ये व्यवसाय म्हणजे यशाची हमी ठरेल. सातपूर व अंबड या दोन्ही औद्

'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन !

इमेज
'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन ! नवी दिल्‍ली::- केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी काल (१५ मार्च २०२३) विभागाच्या 'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी या वार्षिक पुस्तिकेच्या २०२२ च्या आवृत्तीचे अनावरण केले. यावेळी  पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते. प्रकाशन केल्याबद्दल रूपाला यांनी पशुसंवर्धन सांख्यिकी विभागाचे अभिनंदन केले. हे पुस्तक म्हणजे पशुधन क्षेत्रातील परंपरा आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पशुधन लोकसंख्या, पशुधन उत्पादन आणि पशु रोग, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या पशुधन आकडेवारी या पुस्तकात असून हे पुस्तक पशुसंवर्धन क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेते. दूध, अंडी, मांस आणि लोकर या चार प्रमुख पशुधन उत्पादनांच्या २०२१-२२ वर्षासाठीच्या अंदाजावरील माहितीचा आणि एकात्मिक नमुना सर्वेक्षण (आयएसएस) च्या इतर तांत्रिक बाबींसाठी हे पुस्तक म्हणजे प्राथमिक स्रोत आहे. परषोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान, मत्स्यव्यवसाय आणि पशुस

संपादकीय ! आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला जागरूकतेची जोड देऊया !

इमेज
संपादकीय ! आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला  जागरूकतेची जोड देऊया !  नव्या विषाणूने बधितांची संख्या वाढतेय ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक     एच३ एन २ एनफ्लुएंझाला हाँगकाँग विषाणूही म्हटले जाते. यामुळे संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्याचा दर केवळ ७ टक्के आहे. परंतु याबाबत हयगय करू नये. एच३एन२ विषाणूची लक्षणे काय आहेत ? हे समजून घेतले पाहिजेत. हा एनफ्लुएंझा विषाणू असून तो श्वासात संसर्ग निर्माण करतो. देशासह विविध राज्यात या विषाणूने बधितांची संख्या वाढत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातही रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, योग्य आहार घेणे आवश्यक आहे.      डब्ल्यूएचओनुसार एच३ एन२ एनफ्लुएंझा  हा उपप्रकार आहे. तसेही एनफ्लुएंझा विषाणू वर्षभर हवेत पसरलेला असतो. परंतु सध्याच्या वातावरणातील चढ-उतारामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. एच३एन२ संसर्गात श्वास घेण्यात अडचण येणे हे त्याचे सर्वात पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, तीव्र ताप, हगवण, उलटी आणि अंग दुखणे ही लक्षणेही आहेत. काहींच्या बाबतीत सगळी किं

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार-सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे

इमेज
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार-सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे   मुंबई(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुक

विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !

इमेज
विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !  तुमच्या सर्व मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आता मोफत #MentalHealthHelpline उपलब्ध आहे! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण केंद्र परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने एक गोपनीय आणि विनामूल्य 'पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आणि चाइल्ड हेल्पलाइन' सुरू करत आहे - 📞18005322244 / 9594466461 वर सर्व दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उपलब्ध आहे.         ही हेल्पलाइन एक विनामूल्य, गोपनीय आणि ऑनलाइन आणि दूरध्वनी सेवा आहे जी लहान मुले, तरुण आणि प्रौढ ज्यांना त्यांच्या वयाची पर्वा न करता मैत्रीपूर्ण समर्थन किंवा समुपदेशन आवश्यक आहे त्यांना लाभ घेता येईल.         संस्थेचे तज्ञ समुपदेशक सर्व प्रश्न ऐकतील आणि त्यांचे निराकरण करतील यासाठी खालील इमेल द्वारा ही संपर्क साधू शकता. info@parisarasha.org/pahelpline@gmail.com

असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन !

इमेज
असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन ! नाशिक(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड  रिसर्च सेंटर येथे दिनांक १८ आणि १९ मार्च २०२३ या दोन दिवशी असंसर्गजन्य व्याधींसंबंधी एका महत्वपूर्ण संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी २५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.        भारतात आणि महाराष्ट्रात एकूणच असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण वाढत असून मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, गुडघेदुखी, मानसिक आजार, अपघात, लठ्ठपणा हे आजार बळावले आहेत. या परिषदेत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून असंसर्गजन्य व्याधींच्या समस्या, प्रतिबंधित आणि व्यापक उपाययोजना याबद्दल विचारविनिमय होणार आहे.           ही परिषद सार्वजनिक-आरोग्य आणि जन-वैद्यक शास्त्र यासंबंधी असून महाराष्ट्र राज्य पातळीवरील जन औषधवैद्यकशास्त्र या विषयातील शिक्षक, संशोधक व विविध विद्यार्थ्यांची असोसिएशन अर्थात इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन (IAPSM) आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या संस्थां