नासिकच्या मध्यवर्ती भागातउदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" !

नासिकच्या मध्यवर्ती भागात
उदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" !

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801

      नाशिक ( प्रतिनिधी ) - नाशिक हे महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचा कोन असलेले शहर आहे. सर्वाधिक विकास होणाऱ्या या शहरात स्पर्धात्मक युगात उद्योजकांच्या प्रगतीला गती मिळणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अत्यंत मोक्याच्या जागी उद्योग - व्यवसाय असणे गरजेचे आहे. रुंग्टा बिल्डकॉनचा ' बिझनेस पॉईंट ' हा औद्योगिक प्रकल्प शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात उदयाला येत आहे. येथे आपल्या उद्योगाचा प्रारंभ करण्याकरिता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष आकर्षक सवलती देत आहोत. चेअरमन सेंडूराम रुंग्टा यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली.

   रुंग्टा बिल्डकॉन गेली २५ वर्षे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात असून दर्जेदार बांधणी, पारदर्शक व्यवहार, वेळेवर ताबा ही वैशिष्ट्ये आहेत. आता उंटवाडी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात ' बिझनेस पॉईंट ' ही संपूर्ण व्यावसायिक इमारत उभी राहिली आहे. सिटीसेंटर मॉलजवळ असलेल्या या बिझनेस पॉईंटमध्ये व्यवसाय म्हणजे यशाची हमी ठरेल. सातपूर व अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहती येथून अतिशय जवळ आहेत. या ८ मजली इमारतीच्या तीन विंग्ज आहेत. समोर १८ मीटर प्रशस्त रस्ता व ऑफिस धारकांसाठी स्वतंत्र राखीव डबल बेसमेंट पार्किंग आहे. इफेक्टिव्ह प्राईस, बेस्ट पंचतारांकित ऍमेनिटीज या सुविधा येथे मिळतील. क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, मेडिकल व जनरल स्टोअर्स, कन्सल्टन्सी, रेस्टॉरंट्स व अश्या विविध उद्योगांसाठी ही सुयोग्य जागा ठरेल. असे संचालक अनुप रुंग्टा यांनी सांगितले.
    रुंग्टा बिल्डकॉनने यापूर्वी शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी भव्य, दिमाखदार व्यावसायिक प्रकल्प उभे केले आहेत. नाशिकला कमर्शिअल हब बनविण्यात सेंडूराम व अनुप रुंग्टा यांचे मोलाचे योगदान आहे. आतापर्यंत असंख्य संतुष्ट व यशस्वी ग्राहक हीच त्यांच्या कामगिरीची पोचपावती म्हणावी लागेल. येत्या काळात महाराष्ट्र शासन नाशिकमध्ये आयटी पार्क व ऍग्रो इंडस्ट्रीयल पार्क तसेच डाटा सेंटरच्या मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. त्यासाठी ' बिझनेस पॉईंट ' मध्ये व्यवसाय असणे सन्मानाचे व गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत मोक्याचे ठरेल. असे देखील पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेअरमन सेदूराम रुंग्टा यांना गोदा उत्सवात व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।