'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन !

'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन !

नवी दिल्‍ली::- केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी काल (१५ मार्च २०२३) विभागाच्या 'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी या वार्षिक पुस्तिकेच्या २०२२ च्या आवृत्तीचे अनावरण केले. यावेळी  पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते. प्रकाशन केल्याबद्दल रूपाला यांनी पशुसंवर्धन सांख्यिकी विभागाचे अभिनंदन केले. हे पुस्तक म्हणजे पशुधन क्षेत्रातील परंपरा आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पशुधन लोकसंख्या, पशुधन उत्पादन आणि पशु रोग, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या पशुधन आकडेवारी या पुस्तकात असून हे पुस्तक पशुसंवर्धन क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेते. दूध, अंडी, मांस आणि लोकर या चार प्रमुख पशुधन उत्पादनांच्या २०२१-२२ वर्षासाठीच्या अंदाजावरील माहितीचा आणि एकात्मिक नमुना सर्वेक्षण (आयएसएस) च्या इतर तांत्रिक बाबींसाठी हे पुस्तक म्हणजे प्राथमिक स्रोत आहे.

परषोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, पशुसंवर्धन विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह, अतिरिक्त सचिव वर्षा जोशी, अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार संजीव कुमार, सल्लागार (राज्य),  सुमेध नागरे आणि  इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!