संपादकीय ! आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला जागरूकतेची जोड देऊया !


संपादकीय !
आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला  जागरूकतेची जोड देऊया !
 नव्या विषाणूने बधितांची संख्या वाढतेय !
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक

    एच३ एन २ एनफ्लुएंझाला हाँगकाँग विषाणूही म्हटले जाते. यामुळे संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्याचा दर केवळ ७ टक्के आहे. परंतु याबाबत हयगय करू नये. एच३एन२ विषाणूची लक्षणे काय आहेत ? हे समजून घेतले पाहिजेत. हा एनफ्लुएंझा विषाणू असून तो श्वासात संसर्ग निर्माण करतो. देशासह विविध राज्यात या विषाणूने बधितांची संख्या वाढत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातही रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, योग्य आहार घेणे आवश्यक आहे. 
    डब्ल्यूएचओनुसार एच३ एन२ एनफ्लुएंझा  हा उपप्रकार आहे. तसेही एनफ्लुएंझा विषाणू वर्षभर हवेत पसरलेला असतो. परंतु सध्याच्या वातावरणातील चढ-उतारामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. एच३एन२ संसर्गात श्वास घेण्यात अडचण येणे हे त्याचे सर्वात पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, तीव्र ताप, हगवण, उलटी आणि अंग दुखणे ही लक्षणेही आहेत. काहींच्या बाबतीत सगळी किंवा काहीच लक्षणे दिसून येतात. काहींना बिलकूल ताप येत नाही पण इतर लक्षणे आढळतात. या विषाणूच्या संसर्गात वाढ का होत आहे ? याविषयी श्वसनविकार तज्ज्ञ सांगतात की, सध्या पोस्ट कोरोनाचा काळ आहे. अजूनही देशात कोरोनाचे तीन हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. एच३ एन२ संसर्गात वाढ होण्याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले, कोरोनामुळे लोकांची इम्युनिटी कमी होऊन असंतुलित झाली. दुसरे, एच३ एन२ विषाणूने रूप बदलले. विषाणूतील या बदलामुळे संसर्ग वाढला आहे. तसे पाहिले तर एच३ एन२ कोरोना विषाणूपेक्षा कमी घातक आहे. परंतु, भारतात सध्या चार प्रमुख विषाणू सक्रिय आहेत. त्यातच वातावरणात सातत्याने होणारे बदल, दमट हवामान, पाऊस यामुळे या विषाणूला हातपाय पसरण्यास पोषक ठरत आहे.
     कोरोना, एच१एन१, एच३एन२, आणि एडीनो व्हायरस हे उपप्रकार आहेत. विषाणू संसर्गात निष्काळजीपणा करणे चांगले नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार या वेळी एच३एन२ची तीव्रता पूर्वीपेक्षा चार पट अधिक वाढली आहे. एच३एन२ पासून कसा बचाव करता येईल? हे लक्षात घ्यावे.  रुग्णांना कोरोना गाइडलाइनचे कठोर पालन करावे लागेल. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बचावाची सर्वात चांगली पद्धत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जास्त दिवस खोकला आणि सर्दी राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. एच३एन२ एनफ्लुएंझावर अजून कोणतीही लस नाही. यावरील उपचारात अँटिव्हायरल औषधींचा वापर होतो. आयएमएने एच३ एन२ मध्ये डॉक्टरांना अँटिबायोटिक औषधींचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. या विषाणूचा सर्वाधिक धोका सर्वानाच असला तरी एच३एन२ विषाणूचा सर्वाधिक धोका मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारांनी ग्रस्त लाेकांना आहे. दीर्घ काळ सर्दी-खोकला राहिल्यास ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी डॉक्टरकडे त्वरित जावे. अवयव प्रत्यारोपण केलेले लोक, टीबी आणि कॅन्सरग्रस्तांनी एच3एन2 च्या संसर्गापासून सावध राहावे. वेळीच उपचार घ्यावेत. असाही सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !