वाईन फेस्टिवलमुळे नासिकचे पर्यटनात वाढ होईल-आ.सीमा हिरे. अविस्मरणीय क्षणांचा अनोखा संगम म्हणजे नासिक व्हँली वाईन क्लस्टर व ग्रेप काउंटी-एक वाईन प्रेमी

शुक्रवार ९ मार्च १८
नाशिक - एका बाजूला  "महेंगी हुई शराब के थोडी थोडी पिया करो" सारख्या मनाला भावणाऱ्या गझल आणि दुसरीकडे वाईनचे ग्लासवर ग्लास रिचवणारे दर्दी रसिक प्रेक्षक अशा अपूर्व योगात "हॉटेल ग्रेप काऊंटी" येथे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट च्या पाचव्या सत्रास शुक्रवारी सुरुवात झाली . दुपारी ४ वाजेपासूनच शेतकरी बाजार मध्ये शेकडो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती . अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला येथे विक्रीस आणला होता . त्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने टेस्टिंगसाठी  आणि ग्राहकांसाठी सादर केलीत . यावेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथाही चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या . यावेळी ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण , इंडिया ग्रेप हार्वेस्ट चे अध्यक्ष जगदीश होळकर, सेक्रेटरी राजेश बोरसे , राजेश जाधव , प्रदीप पाचपाटील , मनोज जगताप , समीर रहाणे उपस्थित  होते .
रात्री सत्यम आनंद यांचा गझल गायनाचा कार्यक्रम उशिरापर्यंत चांगलाच रंगात आला होता . "होश वालोंको खबर क्या" , "चाँदी जैसा रंग है तेरा" ,"तुजसे  नाराज नही जिंदगी"  या आणि अशाच मनाला भावणाऱ्या गझल त्यांनी सादर केल्या . एका बाजूला वाईन आणि दुसऱ्या बाजूला गझल असा अपूर्व योग येथे जुळून आला होता . अनेकांनी सहकुटुंब वाइन फेस्टिव्हलचा आनंद घेतला . रविवारीही येथे शेतकरी बाजार आणि डी जे स्मोकी सह वाईन फेस्टिव्हल रंगणार आहे .

शनिवार १० मार्च १८
नाशिक -नाशिक व्हँली वाइन क्लस्टर आणि ग्रेप काउंटी रिज़ॉर्ट ने भरवलेला शेतकरी बाजार आणि वाइन फेस्टिवल कौतुकास्पद असून , यामुळे सेंद्रीय शेतीला चालना मिळेल तसेच नाशिकचे पर्यटनही वाढेल , असे प्रतिपादन आ.सीमा हिरे यानी केले .नाशिक व्हँली वाइन क्लस्टर आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिवलच्या भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या .कालही ग्राहकांनी शेतकरी बाजार आणि  वाईन फेस्टिवलचा आनंद घेतला . यावेळी  लहान मुलांनी बनवलेली ,  "अन्नदाता एक  यशस्वी गाथा" ही शेतकरी यशोगाथा असलेली चित्रफीतही दाखवण्यात आली . यावेळी अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांचा आणि वाइन फेस्टिवलचा आनंद उपस्थितानी घेतला .

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!