प्रशासकीय व्यक्तीच्या राजकीय पदार्पणाची प्रस्थापित राजकारण्यांना भीती अन् त्याच प्रशासनावर राजकीय दबाव आणून मुदतपूर्व बदलीचा डाव ! असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन !!! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

प्रशासनावरील राजकारण्यांचा दबाव अन् प्रशासनाधिकाऱ्याचा धाक !
नासिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची झालेली की केलेली बदली या विषयावरून तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे, अहिरराव यांच्या बदलीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात आला असुन इतर तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश एकत्रितरित्या काढण्यात आला असा आरोप जनसामान्यांकडून करण्यात येत आहे, अहीरराव यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याआधीच ही बदली झाली आहे, याबदली मागील गौडबंगाल हे कुतुहल निर्माण करणारे असुन याला राजकीय किनार लाभली आहे असा आरोप तालुक्यातील अनेक संघटनांकडून होत आहे
      राजकारणांतील अतीमहत्वाकांक्षींनी बदलीचा सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, यावरून प्रशासनाधिकाऱ्याचा किती धाक व भीती राजकारण्यांना वाटते तसेच दुसऱ्या बाजूने बघीतल्यास प्रशासनाला राजकारणी आपल्या राजकीय डावपेचाच्या माध्यमातून कसे झुकवतात हेही यानिमित्ताने प्रथमदर्शनी दिसुन येते.
    राजश्री अहिरराव यांनी जर जनतेची कामे केली अाहेत तर त्यांचा यथोचित सत्कार करण्याऐवजी त्यांनी भविष्यात राजकारणांत पाय रोवण्याचे मनसुबे व्यक्त केले असतील या शंकेने त्यांची तालुक्यातूनच उचलबांगडी करावी हा राजकीय डावपेचाचा भाग समजला गेल्याने तालुक्यातील जनता या बदलीप्रकरणाने रडते, बदली रद्द करण्याकरीता निवेदने देते, गांवपातळीवर निषेधाचे व बदली रद्द करण्याचे ठराव पारीत होतात हे चित्र काय दर्शविते असा प्रश्न निर्माण होतो.
            राजश्री अहिरराव यांचे मनसुबे जर राजकारणांतील प्रवेशाचे असतील तर या बदली प्रकरणाने त्यांच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल हे कुणीही सांगेल, व प्रस्थापित राजकारण्यांनसाठी ही बदली मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत, जेव्हा जेव्हा जनता प्रशासनाधिकाऱ्यांच्या बाजूने लढते तेथे राजकारण्यांना बचावात्मक पवित्रा स्विकारावा लागतो , त्यात ते यशस्वी होवोत अथवा न होवोत पण दमछाक जी होते ती टाळता येत नाही तेव्हा जर अविचाराने त्यांच्यावर मात केली तर पराभवाला अगदी जवळून बघावे लागते,
          राजश्री अहिरराव यांची बदली नक्की राजकीय पार्श्वभुमीवर झाली आहे काय, राजकीय हस्तक्षेप असेल का, तालुक्यातील संघटना बदली रद्द करण्यासाठी का सरसावल्यात, जनतेने अश्रु का ढाळले, बदली रद्द होईल का, प्रशासनाची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आलेले दिसतात. यांचे उत्तर येणाऱ्या काळांत मिळतीलही तत्पुर्वी राजश्री अहिरराव या नोकरीचा राजीनामा देऊन खरोखर राजकारणांत पदार्पण करतील काय हा पहिला प्रश्न आहे, बघूयांत,,,,,,,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।