विज वितरण कंपनीच्या सिव्हिल हाँस्पिटल सब स्टेशन मध्ये मातीचा डोंगर !! भिंत कोसळून होणाऱ्या अपघातास कोण राहणार जबाबदार !! सूज्ञ नागरिकांचा प्रश्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक ::- सार्वजनिक बांधकाम विभागांतील  कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ भराव टाकून सुशोभीकरणाचे काम सुरू असताना जानेवारी २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून जीवितहानी झाली. त्याची माघ्यमांमधून बरीच चर्चाही झडली. अशाचप्रकारे पुन्हा तरणतलावाजवळील सिव्हिल हाँस्पिटल सबस्टेशन परिसरात अपघात घडू शकण्याची परिस्थीती निर्माण झाल्याची भावना रहदाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
       सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सपाटीकरण व तत्सम कामे सुरू होती, त्यासाठी भराव टाकून आवारातील जमीनीची उंची वाढविण्याचे काम सुरू असतांना अपघांत झाला. ट्रक्टरची धडक, भरावाची माती, व जीर्ण भींत या कारणामुळे संरक्षक भिंत कोसळली.
       सदर घटना ताजी असतांना महावितरण च्या सिव्हील हाँस्पिटल सब स्टेशन मध्ये संरक्षक जीर्ण भिंतीलगत भराव टाकण्याचे काम सुरू असुन मातीचा मोठा ढिगारा तयार झाला आहे, भरावाची उंची जवळजवळ पंधरा ते वीस फुटापर्यंत असुन भिंचीची उंची जेमतेम चार साडेचार फुटापर्यंत अाहे. संरक्षक भिंतीच्या आतबाहेर विद्युत जोडणीचे लोखंडी पोल उभारलेले आहेत,  भिंतीलगत तरणतलाव वाहतूक सिग्नल असल्याने वाहणे थांबलेली असतात, पादचारी मार्गावरून सर्वसामान्य जनतेचा वावर असतो, सदर रस्त्यावर कुसुमाग्रज प्रतिष्ठाण,मनपा कार्यालय, व शेजारी जिल्हा शासकीय दवाखाना आहे. सतत रहदारी असल्याने जीर्ण भिंत, लोखंडी पोल व तारा भरावासहित कोसळल्यास सार्वजनिक बांधकाम विभागांतील भिंत कोसळल्याच्या अपघाताची पुर्नराव्रुत्ती घडल्यास कुणाला जबाबदार धरणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. अपघात घडण्याआधी विज वितरण कंपनीने या बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ तो भराव काढावा व जीर्ण भिंत उतरवून पुन्हा नवीन संरक्षक भिंत उभारणे हे हितावह ठरेल असे मत सबस्टेशन समोरील जाँगिंग ट्रँकवर येणारे व्यक्त करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!