अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही, माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही नासिककर माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल !
काल नासिकच्या कालीदास कलामंदिर येथे चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलर च्या अनावरणासाठी अलका कुबल, शंतनु मोघे यांना आयोजकांनी निमंत्रित केले होते, या प्रसंगी नासिक शहरातील ख्यातनाम संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक, चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट रसिक, पत्रकार असे मान्यवर उपस्थित होते,
       "आयोजकांनी कार्यक्रमाबाबत दिनांक, वेळ, ठिकाण ठरवल्यानंतर साधा फोन केला नाही" असा जाहीर आरोप अलका कुबल यांनी रसिकांसमोर केला व तीव्र नाराजी व्यक्त करत दिड-दोन मिनिटांत तीन तास ताटकळत असलेल्या रसिकांसाठी आपला "अमुल्य" वेळ दिला.
        परिचय कर्त्याने तर चक्क पाच मिनिटे यथासांग परिचय करून दिला, नासिक करांनी रसिकव्रुत्तीने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली अन्  त्याबदल्यात कुबल यांनी रसिकांसमोर आयोजकांचे "साध्या फोनवरून" जाहीर वाच्यता करुन वाभाडे काढले याबाबत रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. नासिक च्या रसिकांची आवडती "माहेरची साडी फेम" आज आम्ही डोक्यावर घेतलेल्या , अलका आमचीच असल्याची भावना मानत होतो ती अशा गोष्टी चे भांडवल करुन रुसली-फुगली यामुळे माहेराला दुरावली अशी चर्चा महीलावर्गात होत होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !