प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून ‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करावे- जिल्हाधिकारी गंगाथरन डी. नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- नद्या बाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यां बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने 'चला जाणुया नदीला' अभियान शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चला जाणुया नदीला या अभियानासाठी गठित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे दिंडोरी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, इगतपुरी -त्र्यंबकेश्वर उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, बालगाण उपविभागीय अधिकारी बबन काकडे, मालेगाव उपविभागीय अ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा