आयपीएस अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला आयपीएस अधिकारी दर्जा ! पोलिस आयुक्त व डॉक्टर यांचे सर्व स्तरांतून स्वागत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे  सागर बोरसे याची भेट
IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला IPS  अधिकारी दर्जा !
        आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा. सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना  भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांना फोन केला व सागरला भेटण्याची विनंती केली.
        पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी लगेचच येण्याचे आश्वासन दिले पुढच्या पाच मिनिटात मानवता कॅन्सर सेंटर येथे हजर झाले. जेथे सागरचे स्वप्न आयपीएस अधिकारी होऊन समाजाची सेवा करायचे होते, त्या ठिकाणी त्याचे मनोबल घटता कामा नये म्हणून सरांनी त्याला आयएएस होण्याचा सल्ला दिला त्याचे मनोबल वाढवले.
        सागरला भेटल्या भेटल्या त्याचे मनोबल वाढवत त्याला "आयपीएस नव्हे तर तू आयएएस अधिकारी   जरूर होशील" अशी शुभकामना दिली आणि सागराप्रमाणे या समाजाचे दुःख दूर करत विविध व्यथेने ग्रासलेल्या लोकांची मदत करशील याचा विश्वास दिला. त्याला पुढील आयुष्यात मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले, एवढ्यावरच न थांबता पोलीस आयुक्त यांनी आपल्या डोक्यावरील टोपी आणि लाठी त्याच्या हातात देत त्याचे मनोबल वाढवले. पोलीस आयुक्त यांनी डॉक्टर नगरकर यांचे या आगळ्यावेगळ्या उपक्रमात त्या ना सहभागी करून घेतल्या बद्दल धन्यवाद    
दिले. हॉस्पिटल मधील सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी व कर्मचारी वृंदा ने या घटनेचे स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!