कौतुकास्पद !! शेतकरी पुत्र प्रमोद सावंत यांनी नायब तहसीलदार पदाला घातली गवसणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

संतोष गिरी निफाड यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
          नासिक, निफाड::- नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे. चांदोरी गांवचे नाव रोशन  केल्याने चांदोरी गावासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. प्रमोद ने  आपले प्राथमिक शिक्षण चांदोरी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले, त्यानंतर पदवी साठी त्यानी अभियांत्रिकी विभागात मुंबई येथे पदवी व पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अभ्यासा सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला त्यात सलग चार वर्ष त्यांनी पूर्व परीक्षा पार करत मुख्य परीक्षेस पात्र झाले, त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यास सुरु केला, पहिल्याच प्रयत्नात २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार पदाला पात्र ठरला  आहे. त्यांनी नाशिक व दिल्ली येथे वाचनालयात जाऊन अभ्यास केला आहे. प्रमोद चे वडील निवृत्ती सावंत हे  शेतकरी व आई मंगल गृहिणी आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चांदोरी ग्रामस्थांसह जिल्हाभरातून राजकीय, सामाजिक, पत्रकार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रमोद सावंत नवनियुक्त नायब तहसीलदार म्हणतात-
   माझे वडील शेतकरी आहेत, माझ्या मनात अधिकारी होण्याचे स्वप्न होते, तसेच नेहमी लोकोपयोगी कामे करता येतील व त्यातून आदर मिळेल अशी नोकरी असावी, असे नेहमी वाटत होते, आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद वाटत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास  करणाऱ्या तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवावे व आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेऊन अभ्यास करत रहावे.
प्रमोद सावंत यांचे न्यूज मसाला परीवाराकडून हार्दिक अभिनंदन- नरेंद्र पाटील संपादक, 7387333801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।