पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत

इमेज
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला ,  प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर) • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित • बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६ • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत       नाशिक : इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड कंपनीने तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ₹४०८ ते ₹४२९ निश्चित केला आहे. कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपी" किंवा इश्यू) सबस्क्रिप्शनसाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडून १ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. इश्यू-पूर्व उर्वरित ₹१ दर्शनी मूल्याचे १००,४२७,७५३ इक्विटी ...

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

इमेज
नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन           नाशिक : कर्मवीरांच्या त्यागातून आणि अनेक समाजधुरीणांच्या अविरत परिश्रमातून ११२ वर्षांपूर्वी उभी राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्था आज राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी म्हणून या संस्थेकडे पहिले जाते. अवघ्या पाच विद्यार्थ्यापासून सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थी, ११ हजारांहून अधिक शिक्षक, मोठा कर्मचारी वर्ग अशा पद्धतीने मविप्रचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आज इतका मोठा विस्तार या संस्थेने उभा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मविप्र संस्थेचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.  मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील १२८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरासह अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कर्मयोगी द...

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

इमेज
कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर जनशिक्षण संस्थानतर्फे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप           नाशिक (न्यूज मसाला सर्विसेस) : महिलांनी कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कौशल्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराची तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, या किटचा उपयोग करून महिलांनी व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन डांग सेवा मंडळ अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी केले.            अखिल भारतीय महिला परिषद, नवी दिल्ली, सिन्नर महिला मंडळ, सिन्नर आणि जनशिक्षण संस्थान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वावी, ता. सिन्नर येथे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून हेमलता बिडकर बोलत होत्या. जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून महिलांसह विविध वंचित घटकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. महिला सक्षमीकरण...

देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान ! देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता

इमेज
मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान ! देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता : डॉ. हेमांगी पाटील नाशिक : कर्मवीरांच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवून एका छोट्याशा विचाराचे रूपांतर मराठा विद्या प्रसारक समाजासारख्या क्रांतिकारी वटवृक्षात झाले आहे. आज सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आव्हानात्मक काळात संवेदनशीलता व मूल्ये जपणे अधिक गरजेचे आहे. देहदान करणाऱ्या दात्यांचा सन्मान हा समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. हेमांगी पाटील यांनी केले.              मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये मविप्र समाजाच्या समाजदिनानिमित्त आयोजित देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     ...

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

इमेज
आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार ! नाशिक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची रु. १० लाखांपर्यंतची कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांना विना निविदा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद तसेच जिल्हास्तरीय काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून कामांचे प्रस्ताव प्राप्त होतात. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कार्यरत इच्छुक सेवा सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे. प्रस्तावासोबत  १) सेवा सहकारी संस्थेचे ऑगस्ट २००० नंतर स्थापना करण्यात आल्याचे नोंदणी   प्रमाणपत्र (सहकार कायदा १९६० अंतर्गत).,  २) संस्थेच्या मागील दोन आर्थिक वर्षांच्या लेखा परीक्षण अहवालांच्या छायाप्रती,  ३) सेवा सहकारी संस्थेतील सभास...