पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक -- कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

इमेज
समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक - कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन        नाशिक :  - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जलद आणि पारदर्शक पद्धतीने विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी पोर्टल सारख्या माध्यमाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठातर्फे ऑनलाइन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टलचा शुभारंभ कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीस अध्यक्षस्थानी डॉ. गिते यांच्या समवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. विलास वांगीकर, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बी. जे. सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, अधिष्ठाता डॉ. किरण पाटोळे उपस्थित होते.                       यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....

मुंबई-धुळे मार्गिका खुली, वाहतुकीला दिलासा !

इमेज
मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांची माहिती नाशिक  : नाशिक शहरातील द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला वेग आला असून, मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित रस्त्याचे काम १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला (MSIDC) देण्यात आले आहेत. तसेच पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण १३.५ मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.          प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, द्वारका जंक्शन येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी ३१ ऑगस्ट रोजी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

इमेज
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न         नाशिक: - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर विजयी पदाधिकाऱ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.       यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक समस्या प्रतिनधींमार्फत विद्यापीठाकडे दिल्यास त्याची तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल. संशोधन, विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती, क्रीडा व सांस्कृतिक आदींकरीता विद्यार्थ्यांकरीता काम करण्यात येईल. आरोग्य विषयक सामाजिक जनजागृतीकरीता आपले सहकार्य महत्वाचे आहे त्यासाठी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. विद्यापीठ प्रशासन व विद्यार...