पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात- पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा

इमेज
पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात-  पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा नाशिक, दि. २९ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा): अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अवैध उपसा रोखावा, पाणी उपसणारे विद्युत पंप बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच पाणी बचतीसाठी सामूहिक प्रयत्न करताना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले.         जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सन २०२६-२०२७ करिता पाटबंधारे प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याच्या आकस्मिक व प्रासंगिक आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभि...

शासकीय विभागातील पदभरतीच्या बनावट जाहिरातींपासून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सावध रहावे !!

इमेज
पशुसंवर्धन विभागातील पदभरतीच्या बनावट जाहिरातींपासून सावध रहावे- पशुसंवर्धन विभागाचे आवाहन नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::-  नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीबाबत समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या जाहिराती बनावट व अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुषंगाने समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातींमुळे बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.                महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना आणि सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.                ...

जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !

इमेज
संपादकीय  जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत ! राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे खूप काटेकोर नियोजन करणे जलसंपदा विभागासाठी डोकेदुखी ठरू नये यासाठी पारदर्शक प्रयत्न व्हावेत. केवळ बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री नियोजन पुरेसे नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीत पाणी सोडण्याची तयारी करताना जलसंपदा विभागाने जनतेसमोर पाण्याचा संपूर्ण ताळेबंद मांडला पाहिजे. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करताना त्यासाठी जिल्ह्यातील धरणांचा यथोचित आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठी जनसामान्यांच्या पुढील काही ठोस मागण्या आहेत.        धरणनिहाय जलसाठ्याचा ताळेबंद जाहीर करा! गंगापूर, मुकणे, दारणा, आणि दिंडोरी तालुक्यातील संबंधित धरणांतील उपयुक्त जलसाठा, मंजूर पाणीआरक्षण, अपेक्षित वापर आणि कुंभमेळ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी.        कुंभमेळ्यातील प्रत्येक प्रमुख स्नानपर्वणीसाठी किती पाणी आवश्यक आहे, ते ...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री

इमेज
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या पर्वातील पुरस्कारांचे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण नाशिक, दि. १० ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.     ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७...

साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. ८ आक्टोंबर २०२६ चा अंक

इमेज

वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

इमेज
वाडिया रुग्णालयामुळे मालेगावकरांना दर्जेदार आरोग्यसेवेची सुविधा ! रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही  :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे                   मालेगाव (उमाका वृत्तसेवा) : मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या वाडिया रुग्णालयामुळे शहरातील नागरिकांना विशेषतः गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य, तज्ज्ञ डॉक्टर तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.                  महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मालेगाव शहर महापालिकेच्या महापौर शेख नसरीन बानो मो. खालिद, महानगरपालिका आयुक्त र...