माध्यमिक शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या कडे धुळे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार !!

नासिक:- माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या कडे धुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारण्याचे निर्देश !
धुळे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे पदोन्नतीने विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ मुंबई या पदावर पदस्थापना झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर अतिरिक्त कार्यभार नासिक विभागातील अन्य अधिकाऱ्याकडे देण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे केली होती. यानुसार नासिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार तत्काळ स्विकारण्याचा व तसा अहवाल शासनास व आयुक्त कार्यालयात सादर करण्यात यावा असे निर्देश शिक्षण आयुक्त, पुणे यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!