मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नियोजित साहित्य संमेलन पुढे ढकलले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर इगतपुरी तील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन पुढे ढकलले !

नासिक, वाडीवऱ्हे::- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.

        कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते,साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांची निवड करण्यात आली होती.आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साहित्य संमेलनाचे आयोजन याच प्रमुख पाहुन्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली.

       राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमावर बंधने घालून नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते,या अवाहनास प्रतिसाद देत संयोजकांनी हा साहित्य संमेलन पुढे ढकलन्याचा निर्णय बैठकीअंती घेतला, तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आठ दिवस अगोदर साहित्यप्रेमीना  कळविन्यात येईल अशी माहिती ही पुंजाजी मालुंजकर,बाळासाहेब पलटने प्राचार्य भाबड़,प्रा.देवीदास गिरी,अँड़.ज्ञानेश्वर गुळवे,दत्तात्रय झनकर,हिरामण शिंदे,यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।