एक मार्च रोजी राबविली जाणार जंत विरोधी मोहीम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





जंता पासून मुक्त , होतील मुले सशक्त
!

एक मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात राबविली जाणार जंत विरोधी मोहीम !

नाशिक::- जिल्ह्यामध्ये येत्या १ ते ८ मार्च सप्ताहात १ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना जंतविरोधी गोळी दिली जाणार आहे,
भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते, महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणा  मुळे वाढ खुंटलेल्या  बालकांची टक्केवारी एन एफ एच एस ३ सर्वेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलीं मध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो
तसेच  महाराष्ट्रात मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीचे प्रमाण २९ टक्के आढळलेले आहे
त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन ही आरोग्य विभागामार्फत दरवर्षी दोनदा वर्षातून राबविण्यात येते, यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेची आखणी केलेली आहे दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न झाली, या मोहिमेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला बाल विकास विभाग, शिक्षण विभाग या विभागांचा समावेश असून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने त्याचा आराखडा करण्यात आलेला आहे, यामध्ये ३५३२ आशा, ५२२६  अंगणवाडी केंद्र ३९९७ ग्रामीण शाळा, ४८१ प्रायव्हेट शाळा यांचा समावेश असून आशा, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता, शिक्षक सहभागी होणार असून नाशिक जिल्ह्यामध्ये १ ते २ वर्षा वयोगटातील मुलं-मुली १०३८३८ ,
३ ते १९ वर्षे वयोगटातील मुलं-मुली १२३७७३२ असे एकूण १३४१५७० शाळेत जाणारी मुले लाभार्थी असून त्यांना १ मार्च २०२१ रोजी मुलांना जंत विरोधी गोळी दिली जाणार आहे. या दिवशी राहून गेलेल्या बालकांना पुढील ८ मार्च २०२१  रोजी माँप-अप राउंड  दिवशी  गोळी दिली जाणार आहे यामध्ये एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकांना २०० एमजी, "अल्बेंडाझोल"  गोळी दिली जाणार असून २ ते १९ वर्षे वयोगटातील  मुलांना ४०० मिलिग्रॅम ची गोळी चाऊन खाण्यास स्वतः समोर दिली जाणार आहे, यासाठी सर्व विभागाने चांगल्या प्रकारे तयारी केली असून सर्व ठिकाणी त्याची जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी बॅनर, पोस्टर, होर्डिंग ,म्हणी लिहिणे, लाऊड स्पीकर वरून अनाउन्समेंट करणे, इत्यादी प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमाचे संनियंत्रण जिल्हा स्तरावरून करण्यात येत असून येत्या १ मार्च रोजी आपल्या घरातील आपल्या परिसरातील शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांना जंत विरोधी गोळी आठवणीने देऊन त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक