दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !
साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या "लोकराजा" (वर्ष १३ वे) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
           राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक व २०२३ ला प्रभू  श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आले.

           न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी अंक यंदा १३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना ) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल ३१ जुलै २०२४ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख यांना विषयाचे बंधन नाही मात्र अश्लिलता विरहीत असावे. आपली भारतीय संस्कृति, चाली रिती जोपासणारे साहित्य अपेक्षित आहे . शब्दमर्यादा --
कथा १५००/३००० शब्द , लेख १००० शब्द, कविता १०० शब्द आहे, (विषयाच्या अनुषंगाने कमी जास्त, दिर्घ कथा यथोचित मर्यादा) आपली कोणतीही एक उत्कृष्ट साहित्य रचना पुढील पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे, 
पत्ता - 
संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक 
३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२
किंवा
Email- newsmasala1@gmail.com
अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा. धन्यवाद ।

२०२३ च्या प्रकाशन प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस सन्मा. ऍड. नितीनजी ठाकरे, ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुध्दजी धर्माधिकारी, ख्यातनाम अभिनेत्री प्रत्यंचा नराळे-पवार, माहिती व जनसंपर्क नासिक विभागीय उपसंचालक ज्ञानेश्वरजी गुळवे, दैनिक पुढारीचे संपादक मिलिंदजी सजगुरे व संपादक नरेंद्र पाटील,


लेखक कवी यांना दिवाळी विशेषांक भेट देताना !


सन्माननीय पोलिस आयुक्त अंकुशजी शिंदे साहेब, नासिक


सन्माननीय जिल्हा माहिती अधिकारी विलासजी बोडके साहेब 


सन्माननीय गोलाईत साहेब अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नासिक 


सुप्रसिद्ध कवयित्री शोभा सातभाई,

 

सुप्रसिद्ध बालकवी, लेखक विवेकजी उगलमुगले, व अनेक सन्माननीय व्यक्तींच्या हाती लोकराजा दिवाळी विशेषांक पोहचतो, प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र दिलीत, सर्वांचे देऊ शकत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!