पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामपंचायतीला एक कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त !

इमेज
ग्रामपंचायतीला एक कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त ! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याची विभागस्तरावर दिमाखदार कामगिरी ग्रामपंचायत दुगांवला १ कोटींचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. नाशिक विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेत नाशिक तालुक्यातील दुगांव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचा मानाचा पुरस्कार मिळविला आहे.             ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत विभागीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२६ व 'सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, समृद्ध गावाचा संकल्प' ही विभागीय कार्यशाळा अहिल्यानगर येथील नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.         या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमा...

शेल्टर २०२६ स्टॉल लकी ड्रॉ उत्साहात संपन्न, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रेडिओ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग !

इमेज
शेल्टर २०२६ स्टॉल लकी ड्रॉ उत्साहात संपन्न, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रेडिओ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग ! नाशिक::- क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १७ ते २१ डिसेंबर दरम्यान शहरातील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित बहुप्रतीक्षित ‘शेल्टर २०२६’ या द्वैवार्षिक भव्य मालमत्ता प्रदर्शनातील स्टॉल वाटपासाठीची सोडत (लकी ड्रॉ) फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेल, नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.                 या कार्यक्रमात उपस्थित सदस्यांसमोर सर्वप्रथम शेल्टर २०२६ च्या पूर्वपीठिकेच्या स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अनस्टॉपेबल नाशिक’ या विशेष उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शेल्टर २०२६ च्या प्रसिद्धी व प्रसार माध्यमांच्या नियोजनाची तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. क्रेडाई नाशिक मेट्रोचे समिती सदस्य निशित अटल यांनी या दोन्ही उपक्रमांची संकल्पना, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यांची सविस्तर माहिती उपस्थित सदस्यांना दिली.           यावेळी क्रेडाई नाशि...