अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप !वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान !

अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप ! वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान ! नाशिक :- समाज माध्यमांच्या रेट्यापुढे छापील पुस्तके टिकाव धरणार नाहीत हा अपप्रचार असून आजही छापील पुस्तकांकडे वाचकांचा कल आहे. कागदांच्या वाढलेल्या दरांमुळे पुस्तक प्रकाशित करणे आणि वितरीत करणे यात अडथळे येत असले तरी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी सुवर्णमध्य काढत एकत्रित जबाबदारी घेऊन वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले . अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-...