१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले !

१७ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वाबळेवाडी शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले ! 
- शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांचे दैदिप्यमान यश
ता.२८ (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेला शाळेचे एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व ३३ विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये वर्षभर कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या तुषार सिनलकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर साहेब यांच्या हस्ते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.

             राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद आदर्श शाळा, वाबळेवाडीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड होऊन शाळेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यात या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार शिष्यवृत्ती मिळणार असून असे एकूण १३२०००० रुपये या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत. तर याच परीक्षेतून इतर दहा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार असून या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३७२०० रुपये मिळणार असून एकूण ३७२००० रक्कम दहा विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सर्व मिळून विचार केला तर वाबळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना १६९२००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

           निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
             याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, सुनिल पलांडे, एकनाथ खैरे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ, अंगणवाडी ताई सीता मिसाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. 
            तर  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, माजी अध्यक्षा सुरेखा वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, काळूराम वाबळे, आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 
               कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत संदीप गिते, प्रास्ताविक किरण अरगडे तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी मानले.
                वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।