अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप !वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान !

अ.भा. मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप !
वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज
    संमेलनात न्यूज मसाला प्रकाशनचे नरेंद्र पाटील व मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा सन्मान !

         नाशिक :- समाज माध्यमांच्या रेट्यापुढे छापील पुस्तके टिकाव धरणार नाहीत हा अपप्रचार असून आजही छापील पुस्तकांकडे वाचकांचा कल आहे. कागदांच्या वाढलेल्या दरांमुळे पुस्तक प्रकाशित करणे आणि वितरीत करणे यात अडथळे येत असले तरी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी सुवर्णमध्य काढत एकत्रित जबाबदारी घेऊन वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले .

             अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रकाशकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. 
             यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि  विश्वास बँक लि., नाशिकचे संस्थापक विश्वास ठाकूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, नाशिक शाखेचे कार्यवाह सुभाष सबनीस, नाशिक शाखेचे उपाध्यक्ष वसंत खैरनार, नाशिक शाखेचे खजिनदार जी.पी.खैरनार आणि या संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र गुर्जर आदी मान्यवर उपस्थित होते.
           यावेळी बोलताना अॅड. नितीन ठाकरे म्हणाले की, समाज माध्यमांचा उपयोग करून प्रकाशकांची पुढील पिढी पुस्तकांच्या विपणनासाठी योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. नवीन पिढी मोबईलच्या आहारी जात असली तरी त्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देत वाचन चळवळ सुदृढ करण्याची आवश्यकता आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस या नात्याने नाशिक जिल्ह्यातील लेखक-कवींची मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच संस्थेचे सभागृह साहित्यिक उपक्रमांसाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 
           सत्काराला उत्तर देताना हिंगलासपूरकर म्हणाले की, ग्रंथाली प्रकाशन संस्था ही कोणत्याही प्रकाशन संस्थेच्या स्पर्धेत नसून प्रकाशन विश्वात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोश वाङ्मय साहित्य निर्मिती करीत ग्रंथाली वाटचाल करीत असून आगामी काळात विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
       यावेळी अशोक कोठावळे, विलास पोतदार, सुभाष सबनीस, राजीव बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.  
************************************

याप्रसंगी न्यूज मसाला प्रकाशनच्या राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड व अनेक पुरस्कार प्राप्त लोकराजा दिवाळी विशेषांकाचे संपादक नरेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला तसेच मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचा साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला, सदर सन्मान अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, सचिव प्रकाश उखाडे, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र जोशी, पुंजाजी मालुंजकर, जी.पी.खैरनार, तेजश्री उखाडे यांनी स्विकारला.

************************************

छायाचित्र ओळीः- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे,  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।