पैशांची सतत मागणी व पैसे न दिल्यास मोठा दंड आकारणी धमकी देणारा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पैशांची सतत मागणी व पैसे न दिल्यास मोठा दंड आकारणी धमकी देणारा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक (धुळे)::- पो.हे.कॉ.१६२३ नामे उमेश दिनकर सूर्यवंशी (वय ४७) ट्रॅफिक पोलिस, धुळे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार हे कामानिमित्त चाळीसगाव येथून मोटरसायकलने येणे जाणे करतात,  ट्राफिक पोलीस हे तक्रारदार यांना नेहमी धुळे शहरातील तहसील चौक, उर्दु शाळा येथे अडवून त्यांच्या कडे मोटरसायकलचे सर्व संबंधित कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना असतांना सुद्धा त्यांच्याकडे २०० ते ५०० रुपये ची मागणी करतात, पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस जाऊ न देता मोठ्या रक्कमेचा ऑनलाईन दंड देण्याचे धमकावतात, पोलिसांच्या नेहमीच्या पैसे वसुली च्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी दिनांक २ मे रोजी  ला.प्र. वि.धुळे येथे तक्रार दिली होती. त्यावरून आज दिनांक ३ मे रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपये ची मागणी करून सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. सदर सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.                                     

सापळा अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे, सहा. सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक, मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक यांच्या सह सापळा पथक राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रोहिणी पवार यांनी पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव