उद्योजक अनंत सांगळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना प्रवेश ! मातोश्रीवर उध्दव ठाकरेंकडून बांधले शिवबंधन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक चे उद्योजक अनंत (नाना) सांगळेंचा शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश.. माजी मंञी बबनराव घोलप,आमदार नरेंद्र दराडे यांनी दिल्या शुभेच्छा... नाशिक::- येथील उद्योजक "अधिकारी इंडस्ट्रीज" चे संचालक अनंत सांगळे यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधुन सांगळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांगळे हे नाशिकमध्ये विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांनी बेरोजगारी दूर करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्याची दखल शिवसेनेनी घेतली आहे.शिवसेनेच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाठी तसेच सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असून, पुढील काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करत राहणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.