पोस्ट्स

पुढच्या पिढीला "वैभवशाली" इतिहास सांगताना,,,,,,,,. काॅग्रेस कमिटी कार्यालय !!

इमेज
    नासिक::- शहर व जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी एकेकाळी सतत गजबजलेले,  एमजी रोडवरील काॅंग्रेस भवनाची आजची विदारक परिस्थिती. कार्यालय बंद, बाकावर कुणीतरी वामकुक्षी घेत आहे, युवक काँग्रेस चा फलक, गवताने पेव्हर ब्लाॅकमधून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केलेला प्रयत्न शहर व जिल्हा कमिटीलाच संदेश देत असावा. पक्षाच्या झेंड्याखाली येत याच भवनातून मंत्रीपद, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यत्व मिळाले, त्याच मातृसंस्थेची दुरावस्था बघताना कुणालाही दखल घ्यावीशी वाटू नये ही खेदजनक बाब म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेले भवन ! राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाची अशी अवस्था बघून सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल ? याच भवनातून मिळालेल्या जहागिरीला आता जागण्याची वेळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे हायटेक कार्यालये, सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या ही कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आणि वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या

कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज !      नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते, मात्र हे निर्बंध कागदावरच शिथिल असून, मंडप डेकोेरेटर्स व या व्यवसायाशी निगडीत इतरांना जाच कायम आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात असोसिएशनच्या व्यासपीठावरून आवाज उठविला जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशव डिंगोरे म्हणाले की, ‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंडप डेकोरेशन, बॅण्डपथक, लॉन्स धारक व या व्यवसायाशी निगडीत इतर लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र निर्बंध अजून कायम आहेत. लॉन्सधारकांना अजूनही स्थानिक प्रशासनाचा जाच आहे. अधिकाऱ्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत आमचे मरण होत आहे. पालकमंत्र्यांना भेटल्यास अधिकारी दुखावले जात आहेत. तर पालकमंत्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा सल्ला देत आहेत.

अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर        नाशिक दि. - कवितेमध्ये तांत्रिकता महत्वाची नसते आणि तसा हट्टही नसावा. कारण तंत्रशुद्ध कविताच कविता असतात आणि इतर कविता या कविता नसतात का? असा मुलभूत प्रश्न निर्माण होतो. कवितेमध्ये भावगर्भता असावी, रचनेमध्ये सुलभता असावी. कवीने अथवा लेखकाने सातत्याने लिहित जावे. कवीला हुकमी लिहिता यायलाच हवे याबरोबरच कवितेमध्ये उत्स्फूर्तता असावी, शब्द लालित्य असावे. असे प्रतिपादन कवी संतोष हुदलीकर यांनी केले ते नाशिक कवीच्या काव्यकोजागरी निमित्ताने आयोजित  कवी, कविता आणि काव्यसंस्था या विषयावर बोलत होते. यावेळी नाशिक कवीचे कार्यवाह सुभाष सबनीस यांनी कवी आणि काव्यसंस्था याविषयी बोलतांना कवीने एखाद्या कवितेत अडकून पडू नये तसेच नवोदितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी आपली नाळ तुटू देवू नये असे सांगितले. प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट कवी प्रवीण पगार म्हणाले मी कवी असल्याचा मला अभिमान आहे असाच अभिमान प्रत्येक कवीने आपल्या मनी बाळगला पाहिजे. कार्यक्रमाचे आणि  ‘नाशिक कवी’ चे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर यांनी आपल्याला काही सुचल्यानंतर ते जर लिहून ठेवले नाही तर

' लोकराजा 'चे दिमाखात आगमन होत आहे ! संपादकीय सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! - संपादक.

इमेज
दि. २८ आक्टोबर २०२१ चे संपादकीय,,,,, ' लोकराजा 'चे दिमाखात होणार आगमन !    दिवाळी अंकांच्या बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच न्यूज मसाला साप्ताहिकाचा ' लोकराजा ' दिवाळी अंक उद्या दिमाखात दाखल होत आहे. १० वर्षांची परंपरा कायम ठेवत  'लोकराजा' दिवाळी विशेषांक नेहमीच वाचक, साहित्यिक, वर्गणीदार यांच्यात लोकप्रिय ठरला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याने जबाबदारीत वाढ करून घेतली. आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेकडूनही गौरविण्यात आले मात्र अडचणींना तोंड देतांना ' लोकराजा 'ने दर्जात कधीही तडजोड केली नाही व करीत नाही. जाहिरातींचा ओघ कमी झाला त्यामुळे आर्थिक ओढाताण सहन करावी लागते पण सर्वांचा विश्वास संपादन केला असल्याने यंदाही ' लोकराजा ' तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी दिवाळीचा साहित्यिक फराळ घेऊन येत आहे. हे सांगताना निश्चितच समाधान वाटते.      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षे सर्वानाच खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व प्रकाशन संस्थादेखील सुटल्या नाहीत. गतवर्षीच्या कठोर टाळेबंदीत प्रकाशन व्यवसाय अनेक स

मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक !     शालांत परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या एका युवकाने आपली अभ्यासू वृत्ती, हुशारी, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर इंग्लिश व जर्मन भाषेत आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन केले आहे. तो पारंपरिक वारली चित्रकार तर आहेच ; पण वारली जमातीची समृद्ध परंपरा, चालीरीती यांचा अभ्यास करून  त्याने वेळोवेळी विपुल लिहिले देखिल आहे. त्याने ७०० लोककहाण्यांचा संग्रह केला असून त्यावर आधारित १०१ वारली चित्रेही रेखाटली आहेत. सध्या एक २०० पानी पुस्तक इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध करण्याचे काम आणि त्यासाठी चांगल्या प्रकाशकाचा शोध सुरु आहे. याशिवाय कालौघात नष्ट होऊ पहाणाऱ्या १४ पारंपरिक वाद्यांचा अभ्यास तो करतोय. या कलाकार - साहित्यिकाचे नाव आहे मधुकर वाडू. त्याच्या कार्याची व्याप्ती व परीघ मोठा असल्याने, दोन भागांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध...    मधुकर रामभाऊ वाडू यांचा जन्म १९६८ साली जव्हार जवळच्या आपटी पाड्यावर झाला. पालघर तालुक्यातील मनोर जवळच्या कोंढाण या दुर्गम गावात ते राहातात. आई जानकीबाई शेती करायची तर वडील रामभाऊ सामाजिक कार्यकर्ते. शेतमजूर शेत

दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार ' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार ' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ !    नाशिक ( प्रतिनिधी )  प्रभाग क्रमांक सहा मखमलाबाद येथे ' घर तिथे दिवा ' या विशेष उपक्रमाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगरप्रमुख अंकुश प्रकाश काकड व सौ. सुवर्णा अंकुश काकड यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू करण्यात आली. या उपक्रमामागील उद्देश कोरोनासारख्या महामारीमध्ये जी असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली त्यांना मायेचा आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे हा आहे.    मागील दीडवर्षात अनेक कुटुंबामधील कर्तेधर्ते पुरुष, कमावती तरुण मुले, घरातील महिला - भगिनी यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे कुटुंबांमध्ये दाटून आलेला अंधार दूर करण्याकरिता ' घर तिथे दिवा ' हा उपक्रम हाती घेतला. त्यातून शिवसेना सदैव आपल्या पाठीशी राहील हा संदेश देण्यात आला. शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठानने सहकार्य केले. उपक्रमाच्या प्रारंभी देवी मंदिरात दिवे प्रज्वलित करून कोरोनाचा सर्वत्र नायनाट व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली. याव

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन !             नासिक ::-२१ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांचे तर्फे नाशिक जिल्ह्यात साजरा होणार राष्ट्रीय गलगंड दिवस अर्थात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम २०२१, प्रत्येकाच्या शरीरातील आयोडीनचे प्रमाण चांगले राखण्यासाठी व गलगंड होऊ न देणे कामी जनजागृती दिन साजरा करण्यात येतो, राष्ट्रीय गलगंड दिनाचे ( आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम ) औचित्य साधून नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये राष्ट्रीय गलगंड दिनानिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिचारिका प्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थिनी तसेच आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये निबंध स्पर्धा होणार असून, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर तयार करणे, चित्र गोष्ट तयार करणे,  तसेच पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात येणार आहे. पेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय गलगंड दिन साजरा करण्यात येणार आहे, याची पूर्वतयारी करण्यात येत असून आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्ट