पोस्ट्स

४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !

इमेज
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण ! पिंपळगाव बसवन्त येथील  व्यंकटेश बालाजी मंदिर    श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.  मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे.    पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून तसेच मंदिर उभे करण्याचा संकल्प

४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !

इमेज
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण ! पिंपळगाव बसवन्त येथील  व्यंकटेश बालाजी मंदिर    श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.  मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे.    पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून तसेच मंदिर उभे करण्याचा संकल्प

नासिकच्या युवा उद्योजकाचा सन्मान करणार माॅरिशसचे राष्ट्राध्यक्ष ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अचिव्हमेंट अवाॅर्ड घोषित !!

इमेज
मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष करणार नाशिकच्या आबासाहेब थोरात यांचा गौरव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड घोषित नाशिक (प्रतिनिधी) ::-नाशिक येथील युवा उद्योजक, इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सचे डायरेक्टर आबासाहेब वामनराव थोरात यांना मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनच्यावतीने नुकताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड’ घोषित करण्यात आला असून, हा अवॉर्ड मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते श्री. थोरात यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सच्या सीईओ स्वप्ना आबासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आबासाहेब थोरात उपस्थित होते.                या पुरस्काराविषयी सांगताना स्वप्ना थोरात म्हणाल्या की, ‘पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संम्मेलने आयोजित केली जात आहेत. याची दखल मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनने घेत मॉरिशसमध्ये अशाप्रकारचे साहित्य संम्मेलन आयोजित केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार म

प्रतिक्षा संपली,,,,,,,,, मा. खास. श्री. श्रीनिवास पाटील यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर झळकणार !

इमेज
प्रतीक्षा संपली......     ज्याची न्यूज मसालाचे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक दरवर्षी आतुरतेने वाट पहातात ती प्रतीक्षा आता संपली आहे. आनंदाची बातमी म्हणजे राष्ट्रीय विक्रम नोंदविणारा, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला पहिलाच आणि एकमेव न्यूज मसाला चा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर यंदा ११ वे पुष्प गुंफताना खा. श्रीनिवास पाटील यांचे छायाचित्र प्रकाशित होणार आहे.           सातारा मतदारसंघातून ३ वेळा खासदार झालेले श्रीनिवास पाटील यांचे वय ८२ आहे हे त्यांच्याकडे पाहून कोणालाही खरे वाटत नाही. एमए, एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर प्रथम त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला. जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांना नृत्याची विशेष आवड होती. आंतरराज्य समूह स्पर्धेत त्यांनी सहभागी होऊन आपल्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले होते. चौफेर वाचन, दांडगा लोकसंपर्क, जनतेशी जुळलेली नाळ ही त्यांची वैशिष्ट्ये. सर्वांशी आपुलकीच्या नात्याने वागणारे खा. श्रीनिवास पाटील म्हणूनच सर्वांना

कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन !

इमेज
कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन !   डॉ. शांताराम नाईक यांचे आकस्मिक निधन मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम बाबुराव नाईक (निवृत्त) यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी कांदिवली येथील राहत्या घरी ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ८ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या डॉ. शांताराम नाईक यांचे अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाले होते. तर एल्फिन्स्टन महाविद्यलयात त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल (के. ई. एम.) आणि शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम. बी. बी. एस. पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात रूजू झाले.  त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. अतिशय शांत, संयमी तसेच इतरांच्या समस्येत सल्ला देऊन त्यांना सुयोग्य मार्ग दाखवणारे डॉ. शांताराम नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे समस्त कुटुंब, सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार दुःखात बुडाले आहेत.

आई वडीलांच्या अकल्पित निधनानंतर त्यांच्या इच्छेला भूषण ने विधी परीक्षेत प्रथम श्रेणीत येत संयमाने गवसणी घातली !

इमेज
भूषण ओवे विधी परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एल. एल. बी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विवेकानंद विधी महाविद्यालयात शिकणार्‍या भूषण गिरीष ओवे ७०% गुणांसह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.           वडीलांचं आपत्कालीन निधन त्यानंतर आईने अविरत घेतलेले परिश्रम. कोरोना काळात तिचंही ह्या मुलांना एकाकी करून देवाघरी निघून जाणं. अशा विपरीत परिस्थितीत मनाचा जराही संयम ढळू न देता भूषण यांनी आपल्या आईचं स्वप्न साकार केलं. भूषण ओवे यांचे यश नेत्रदिपक असेच आहे. आज त्यांनी आपलं "भूषण" हे नाव सार्थ ठरवलं. विधी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल भूषण ओवे यांचे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !

इमेज
बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है  !                ‘ दिए जलते है ,  फूल खिलते है ,  बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है  ! ’  १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नमकहराम चित्रपटातील गीतकार आनंद बक्षी यांचे हे गीत ,  अगदी समर्पक आणि अर्थपूर्ण आहे .  ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार   ( यंदा दि .  ७ ऑगस्ट )  म्हणजे तरुणाईचा आवडता  ‘ फ्रेंडशिप डे ’  अर्थात   मैत्री दिन .  या दिवशी विविध रंगांचे धागे एकमेकांच्या हातावर बांधून मैत्रीचे संदेश एकमेकांना पाठविले जातात .  या संदेशांमधून मैत्रीच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचावयास मिळतात .  त्यापैकी संकटात जो पाठीशी उभा राहतो ,  तोच खरा मित्र असतो ,  अशी मित्राची व्याख्या बहूतेकांनी केलेली पहावयास मिळते .  तथापि ,  ‘ संकटकाळी मदतीस येतो तो खरा मित्र नसून ज्याला आपल्या मित्राच्या उन्नतीतून खरा आनंद मिळतो ,  तोच खरा मित्र असतो ’  अशी मैत्रीची अचूक व्याख्या हिंदी कवी कमलेश्वर यांनी केली आहे .     एकदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांना त्यांच्या मित्रांनी मैत्रीची व्याख्या विचारली असता ,  त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्रता