दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा !

दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा ! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, मुंबई::- मुंबई आणि ठाण्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी या धार्मिक सणाचा व्यासपीठ म्हणून वापर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी विविध दहीहंडी स्थळांना भेटी देऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार असलेली भाषणे दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. निवडणुकीपूर्वी मतांचा जोगवा मागण्यासाठी गुरुवारी ‘दहीहंडी’ या धार्मिक उत्सवाचे राजकीय गर्दी जमवण्याच्या कार्यक्रमात रूपांतर झाले. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील नेत्यांनी मुंबई आणि ठाणे लगतच्या दहीहंडी स्थळांचा राजकीय दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मंडळांना भेटी दिल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात मंडळांना भेट दिली आणि शिवसेना (उबाठा) आदित्य ठाकरे नऊ स्थळांवर पोहोचले. कार्यक्रम स्थळांवरील भाषणे हा सत्त