जिल्हा आरोग्य अधिकारी तथा क्षयरोग अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा क्षयरोग अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

   नासिक(जळगाव)::- तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव. (सध्या नेमणूक जिल्हा क्षयरोग अधिकारी) डॉ. देवराम किसन लांडे जळगाव तसेच पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी यांस लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.


         तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरिता आलोसे डॉ.  देवराम लांडे, DHO जळगाव (तत्कालिन) यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ५००००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
         सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक पो. नि. रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पो. शि. संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे यांनी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !