स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८, महानगरपालीकेप्रमाणेच ग्रामीण भागाचे सर्वेक्षण होणार !! आज जिप अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक(२५)::--  केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली असून हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतीचे यामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून याबाबतच्या सूचना गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.
         यापूर्वी केंद्र शासनाकडून महानगर पालिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत होते. आता ग्रामीण भागातही सदरचे सर्वेक्षण करण्यात येणार असून “देशभरातील सर्वच 698 जिल्हे यात सहभागी आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून 10 गावे याप्रमाणे 6 हजार 980 गावांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण 34 हजार 900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
          यात प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार असून या  सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत प्रत्येकी 3 ते 4 गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 7 ते 8 गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल.

अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसित केली आहे. या माध्यमातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती, 30 टक्के प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण’ अंतर्गत स्वच्छतेसाठी निवडलेले गावे, हागणदारी मुक्त गावांची स्थिती, हागणदारी मुक्त गावांची पडताळणी, जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली जाईल. प्रत्यक्ष पाहणी माहितींतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता या सर्व बाबींचा विचार केला जाईल. प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती गोळा केली जाईल. यांतर्गत बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी गेली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागरुकता, स्वच्छ भारत मिशनबद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची विल्हेवाट कशी लावता येईल याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.

कार्यशाळेचे आयोजन

“स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” अंतर्गत सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी तसेच सर्वेक्षणाचा शुभारंभ करणेसाठी गुरुवार  (दि. २६) रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कायर्कारी अधिकारी ईशाधिन शेलकंदे यांनी दिली. या कार्यशाळेत प्लास्टिक अधिसूचनेची अंमलबजावणी, शाश्वत स्वच्छता कृती आराखडा याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे सामन्वक चंद्रकांत कचरे, युनिसेफचे जयंत देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.


Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!