राहुडे अतिसाराचे बळींची संख्या चारवर !! नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिणे व प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी-शितल सांगळे, खासदार चव्हाण यांनीही केली पाहणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

              नाशिक(१३)::– दुषित पाण्यामुळे  अतिसाराचा उद्रेक होवून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी भेट देवून याबाबत माहिती घेतली.  दरम्यान, खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनीदेखील राहुडे गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली.
८ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील राहूडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत अति पावसामुळे विहिरी शेजारील नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दुषित होवून अतिरासाराची लागण झाली असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, त्यापाठोपाठ कळवण तालुक्यातील वीरशेत येथे पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या हातपंपाचे पाणी पिल्यामुळे साथीचा उद्रेक झाला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत, जलव्यवस्थापन सभेत तसेच स्थायी सभेत याविषयी चर्चा झाली होती. घटनेची सर्व चौकशी करून संबधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश शितल सांगळे यांनी दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी रजेवरून परतताच पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबधित यंत्रणांनि जबाबदारीने काम करण्याचे आदेश व जिल्ह्यातील सर्व पाणी स्त्रोतांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी विहिरीची पाहणी करण्यात आली. गावात उघडण्यात आलेल्या बाह्य रुग्ण कक्षास भेट देवून उपचार घेत असलेल्या दोघा रुग्णांची विचारपूस करण्यात आली. गावातील स्वच्छता, औषधसाठा, यांची माहिती घेवून गावात नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, ज्योती जाधव, पंचायत समिती सभापती सुवर्णा गांगोडे, गट विकास अधिकारी केशव गड्डापोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लीना ढाके, डॉ. उदय बर्वे, उदय सांगळे आदि उपस्थित होते. खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनीदेखील घटनास्थळी भेट घेवून याबाबत माहिती घेतली.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी दिंडोरी तालुक्यातील पांडाने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन साथरोग किट उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच पाणी नमुने तपासणी, पाणी शुद्धीकरण याबाबत माहिती घेऊन पावसाळ्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!