देशसेवेचा वसा जपत देशाची मान उंचावणे आजच्या विद्यार्थ्यांच्या हाती आहे-डाँ.रविंद्रकुमार सिंघल, (नासिक पोलीस आयुक्त), पश्चिम विधानसभा मतदार संघातील १५०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , आयोजक आमदार सीमा हिरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

         नाशिक(८)::-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल  प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणाप्रसंगी जीवनांत यशस्वी होत असतांनाच सामाजिक समरसता अंगी बानगावी, आत्मसात करावी व देशसेवेचा वसा जपत देशाची मान जगात उंचावणे हे सर्वस्वी आपल्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हाती अाहे असे मनोगतातून व्यक्त केले, या प्रसंगी आमदार सीमा महेश हिरे , जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नितिन बच्छाव, सुनील बागुल, भाजपा नेते महेश हिरे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटिल, भाजपा नवीन नाशिक अध्यक्ष बाळासाहेब पाटिल सातपुर मंडळ चे अध्यक्ष शशिकांत जाधव, रश्मि हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे सर्व नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा,कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक वर्ग नागरिक उपस्थित होते कार्यक्रमात १५०० गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा महेश हिरे यांनी केले होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)