राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन ! उद्योजक तथा नवउद्योजकांना मार्गदर्शनाची एक अमुल्य संधी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन,
नासिक (२४)::- उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सँटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून द्वैवार्षिक राज्यस्तरीय "उद्योगकुंभ २०१८" चे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आयोजकांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.
          महाराष्ट्र राज्यातून नामवंत तसेच नव उद्योजक यांत सहभागी होत असुन इतरांनाही उद्योगकुंभात सहभाग नोंदविता येणार आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वा. नासिक शहरांतील हाँटेल एक्स्प्रेस इन , मुंबई आग्रा रोड येथे एकदिवसीय स्वरूपाचा उद्योग कुंभ भरणार आहे.
        यांत सहभागी होण्यासाठी मोजक्याच जागा शिल्लक आहेत, इच्छुकांनी http://udyogkumbh. Com/ वर प्रवेश शुल्कासह नोंदणी करावयाची असुन अधिक माहीतीसाठी संदीप सोमवंशी-09850952266,  प्रणिता पगारे-09967989444,  योगेश नेरकर-09503842431  यांच्याशी संपर्क करावा,
              "एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत" हा विचार घेऊन क्लबकडून उद्योग विकासाचे काम सुरू आहे, ही चळवळ अधिकाधिक उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सतत होत असुन याचाच हा द्वैवार्षिक उद्योगकुंभ आयोजनाचा एक भाग आहे, या वर्षीचे "CHANGE " अर्थात "बदल" हे ब्रीद स्वीकारण्यात आले आहे.
     " उद्योगकुंभात काय ?"
* व्यवसाय म्हणजे काय
* व्यवसाय कसा करावा
* आर्थिक संकटाचा सामना
* नेटाने व्यवसाय व्रुद्धी
* नवीन संधी
* संधी उपलबधतेचा मार्ग
* स्टार्टअप पाँलीसी
* मुद्रा कर्ज
* इतर कर्ज
* वितरण
.   अशा प्रकारचे सर्व मार्गदर्शन या विषयांतील तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून मिळणार आहे,
       " उद्योगकुंभ २०१८" च्या एकदिवसीय परिषदेमध्ये राज्यमंत्री तथा अध्यक्ष साई संस्थान तथा हावरे बिल्डर्स चे यशस्वी संचालक सुरेश हावरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असणार आहेत, तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आय.टी. तज्ञ तथा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, राष्ट्रीय स्तरावरील कार्पोरेट लाँयर नितीन पोद्दार, आंतरराष्ट्रीय सौंदर्य तज्ञ रेखा चौधरी, मेक इन इंडीया उपक्रमाचे शासनाचे भागीदार कँप्टन अमोल यादव व सनराईज गोल्ड चे भावेश भाटीया उपस्थित राहणार आहेत.
       प्रमुख मार्गदर्शक वक्ते क्लाऊड सर्विसेसचे पियुष सोमानी , आँईल अँड एनर्जी तज्ञ सुधीर मुतालिक, कराराने कुक्कुटपालन निर्माते श्रीक्रुष्ण गांगुर्डे, उद्योगवाढ सल्लागार श्रीरंग तांबे, निवेशक विक्रांत पोतनीस, आर्थिक सल्लागार बाळक्रुष्ण चांडक मार्गदर्शन करणार आहेत.
     या परिषदेचा लाभ उद्योजक तसेच नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन सँटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे केले यांवेळी महेश सावरीकर, प्रविण काकड, प्रशांत जोशी, अर्चना जंगडा, चारूशीला कुलकर्णी, झाकीर मन्सुरी, अमोल कासार, मधुरा क्षेमकल्याणी, तुषार पाटील, पराग मनोलकर, समीर शहा आदी उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!