९४ शिक्षकांना दणका ! खोटी माहीती सादर प्रकरणी आढळले दोषी !! एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, बदली विकल्पही नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

  ९४ शिक्षकांना डाँ.नरेश गितेंचा दणका, कायमस्वरूपी एक वेतनवाढ कायमची बंद तसेच बदली विकल्पही नाही,
        नाशिक – शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची ऑनलाईन प्रकीयेद्वारे बद्लीप्रक्रिया पूर्ण केली मात्र यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या आहेत अथवा बदलीतून सुट घेतली अशा १९४ शिक्षकांची सुनावणी घेण्यात आल्यानंतर खोटी माहिती भरून शासनाची दिशाभूल करणाऱ्या ९४ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दणका दिला असून एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे त्यांना बदलीसाठी विकल्प भरता येणार नसून अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.
        शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती पत्नी एकत्रीकरण याबाबत  खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व १९४ शिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या. या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सतत्येविषयी तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात आल्या होत्या. यापैकी १०० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी ९४ शिक्षकांचा खुलासा अमान्य करण्यात आला असून त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. तसेच या शिक्षकांची दोषी ठरल्यामुळे पुढील बदली प्रक्रियेत त्यांना विकल्प राहणार नसून अवघड भागात त्यांची बदली होणार आहे. अशा शिक्षकांचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ९४ व्यतिरिक्त अजून १५ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांचेवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, या सुनावणीत  दोषींवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्यावर एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याबरोबरच त्यांना अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!