निलंबित ग्रामसेवक "वजनदार" संबंध वापरून झालेली बदली रद्द करण्यासाठी प्रयत्नशील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

निलंबित झालेला तळेगांव दिंडोरी चा ग्रामसेवक "दक्षिणा" देऊन पुन्हा त्याच जागेवर येण्यास प्रयत्नशील ?
नाशिक - दिंडोरी तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथे मुख्यकार्यकारी डाँ नरेश गिते यांनी भेट दिली तेव्हा संबधित ग्रामसेवकाने कपाटाची चावी कर्मचाऱ्याकडे असल्याचे कारण देउन दोन दिवसांची वेळ मिळविण्यात यश मिळविले होते, मात्र मुदत संपूनही एक महिण्याच्या आसपासचा कालावधी निघून गेला तरीही ग्रामपंचायतीचे दप्तर जिल्हा परिषद ला घेऊन येण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबधित ग्रामसेवकास ५ जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले होते व त्याची अन्यत्र बदली केली होती. मात्र संबधित ग्रामसेवकाने "राजकीय वशिला" व "अर्थपूर्ण व्यवहार" करण्याच्या प्रयत्नांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा त्याच गावांत येण्यास जोरदार "फिल्डिंग" लावल्याची चर्चा आहे.आणि असे झालेच तर कर्तव्यदक्ष व कडक शिस्तीचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे नेमके राजकीय दबावाला की अर्थपूर्ण व्यवहाराचे बळी ठरतील असा प्रश्न निर्माण होत आहे, तरीही  मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहतील !  असेही बोलले जात आहे.
         संबधित ग्रामसेवकाने केलेल्या कामांचे मुल्यांकन करण्यात आलेले नसल्याने मोठा घोटाळा झालेला आहे व तो सावरण्यासाठी "वजनदार"  राजकीय, सामाजिक व व्यावसायिक संबधाचा वापर करून झालेली बदली रद्द करून त्याच गांवी राहून आजपर्यंत केलेल्या कामांमधील अनियमितता झाकण्याचा प्रयत्न होण्याची चर्चा होत आहे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।