कामात हलगर्जीपणा केल्याने दोघे निलंबित !!! लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेत करण्यात आले निलंबन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – इ निविदेच्या कामात विलंब करुन कामात हलगर्जीपणा करणा-या इवद विभागातील कनिष्ठ लिपिकास तसेच प्रशासकीय मान्यतेबाबतच्या नस्ती स्वत:कडे ठेवून घेणा-या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहाय्यक लेखाधिका-यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निलंबित केले आहे.

      पंचायत समिती सुरगाणा येथे कार्यरत कनिष्ठ सहाय्य्क अमित आडके यांना तीन दिवस इवद क्र. १ या विभागात कामकाज करणेसाठी आदेशित करण्यात आले होते. उर्वरित तिन दिवस त्यांनी सुरगाणा येथे कामकाज करणे आवश्यक असताना तेथे ते कामकाज करणेसाठी हजर झाले नाही. त्यामुळे त्त्यांचेकडील काम मोठया प्रमाणात प्रलंबित राहिले आहे. इवद विभागात अमित आडके यांना निविदा संकलनाचे कामकाज देण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यारंभ आदेश देणे आवश्यक असताना त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. ८० अंगणवाडी कामांना प्रशासकिय मान्यता मिळून देखील इवद विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नसल्याचे आढळून आले होते. निविदा विषयक कामकाज मोठया प्रमाणावर प्रलंबित ठेवल्याने त्यांच्याकडील पदभार अन्य कर्मचा-याकडे देण्यात आला होता. मात्र आडके यांनी पदाचा पदभार हस्तांतरीत केला नाही.  बांधकाम विभाग अंतर्गत कामाच्या निविदा दोन महिने होवून देखील न उघडणे, निविदा दर कमी असून देखील त्या डावलून मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावीत या उददेशाने अनेक काम पुर्न प्रसारीत करणे याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. विविध कामांमध्ये हलगर्जीपणा करणे व कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिक अमित आडके यास निलंबित करण्यात आले आहे.

      ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ११ नळ पाणीपुरवठा योजनांच्या प्रशासकीय मान्यतेच्या नस्ती मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्याने विभागास परत करुन सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.  मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यावर सदरच्या नस्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक असताना कोणतेही कारण नसताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील लेखाधिकारी तुकाराम बनकर यांनी सदरच्या नस्ती स्वत:कडे ठेवून घेतल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विचारणाही झाली होती. वरिष्ठांची दिशाभूल करुन स्वत:कडे नस्ती ठेवून घेतल्यामुळे पाणी पुरवठा योजनांच्या प्रशासकीय मान्यतेस विलंब झाला. याबाबत दोषी आढळल्याने लेखाधिकारी तुकाराम बनकर यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।