माध्यमांसमोरील भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजप शिवसेनेचे माध्यमांसमोरचे भांडण म्हणजे जनतेच्या
डोळ्यात निव्वळ धूळफेक - माजी खासदार समीर भुजबळ

 

नाशिक,दि.३ जानेवारी:- निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने माध्यमासमोर खोटी भांडणे करून देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहे. आज त्यांनी नाशिक तालुक्याचा दौरा केला.  यावेळी गिरणारे गण - मातोरी, देवरगाव गण -धोंडेगाव, गौवर्धन गण, विल्होळी गण,पिंप्री सय्यद गण,एकलहरे गण,  पळसे गण व लहवित गणाचा आढावा घेण्यात आला.
           जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,नाशिक पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर आदी उपस्थित होते.
           यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, प्रत्येक गावातील नागरिकांशी कनेक्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एनसीपी कनेक्ट हे अॅप तयार केले असून या माध्यमातून प्रत्येक नागरीक पक्षाशी जोडला जाणार असून त्यात्या भागातील नागरिकांच्या समस्या समजणार आहे. कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी जोडण्यासाठी एनसीपी कनेक्ट हे अॅप महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी देखील या माध्यमातून कमी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की,शिवसेना भाजप सरकारने देशातील जनतेचे स्वप्नभंग केले आहे. शेतकरी, युवक,महिला यांचे प्रश्न युती सरकारला सोडवता आले नाही. सद्याच्या सरकारकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतमालाचे भाव पडले असतांना सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची परिस्थिती आहे. देशातील दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले असतांना आद्यपपर्यंत १५ लाख लोकांना देखील रोजगार देऊ शकले नाही. केवळ घोषणाबाजी करणारे सरकार कडून प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे झाली मात्र युती सरकारच्या काळात विकास खुंटला आहे.जिल्हा आणि तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला सरकार बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, गाव प्रामुखाने गावातील सर्वांना सोबत घेऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा. केंद्र प्रमुखाने केंद्रातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. बूथ प्रमुखाने कार्यकर्ते जोडण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. हे अॅप गाव पातळीवर पक्ष संघटना बांधणीसाठी करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. पदाचा बडेजाव बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामाला झोकून द्यावे असे सांगून त्यांनी गटप्रमुख, गणप्रमुख,केंद्र प्रमुख, गाव प्रमुख आणि बूथ प्रमुखांशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दि.१६ व१७ जानेवारीला जिल्ह्यात येणाऱ्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी कोंडाजीमामा आव्हाड म्हणाले की, भाजप सरकारमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. केवळ आश्वासने देणारे सरकार असून जनतेची फसवणूक केली जात आहे. सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला देशातील आणि राज्यातील सरकार बदलावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही