आता बोला ! २०१७ पासुन गैरहजर शिक्षकाची आँनलाईन बदली ! बदली प्रकरणाने तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

           नाशिक –  इगतपूरी तालुकयातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सन २०१७ पासून अनधिकृत गैरहजर असतानाही २०१८ मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करुन गैरहजर शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीस मान्यता देण्या-या इगतपूरी तालुकयातील तत्कालिन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

      इगतपुरी तालुकयातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बापु भिवसन पाटील हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र मार्च २०१७ पासून ते अनाधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द खातेचौकशी करणेकामी कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विशेष म्हणजे सदर शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर असल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनीच सादर केला होता. तरीदेखील २०१८ मध्ये झालेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सदर शिक्षकाने पेहरेवाडी येथून विनंती बदलीबाबत ऑनलॉईन माहिती भरुन मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी त्यास मान्यता दिल्याने संबंधित शिक्षकाची कळवण तालुकयातील आठंबे येथे बदली झाली. याप्रकरणी इगतपूरी तालुकयातील तत्कालिन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापक यांनी पदाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याने त्यांचेविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !