आज महिला मुक्ती दिनाचे आयोजन ! गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व मित्रांना शेअर करा !!!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिन ...

     नासिक::-माळी समाज सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिनाचे आयोजन  करण्यात आले आहे व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या समाजातील गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार सोहळा आज गुरुवार दि.०३ जानेवारी २०१९  रोजी सकाळी ११.३० आय.एम.ए हॉल शालिमार, नासिक येथे आयोजीत केला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मेट शिक्षण संस्थेच्या विश्वस्थ शेफाली भुजबळ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सुनिता निमसे असतील तर ,निलीमाताई सोनवणे,प्रीती महाजन,योगिता जाधव ,अंजना गांगुर्डे,मीनाक्षी पाटील नगरसेविका सत्यभामा गाडेकर ,माधुरी बोलकर ,सुप्रिया खोडे,कुसुमताई शिंदे  उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमास संस्थेच्या सर्व सभासदांनी व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत ,माळी समाज सेवा समितीचे महिला मंडळाच्या अध्यक्षा  मंगला माळी , कार्याध्यक्षा मंगला जाधव  , उपाध्यक्षा संगीता अहिरे ,सरचिटणीस चारुशीला माळी ,संध्या गिरमे अरुणा पगार ,सुशीला महाजन ,अशा जाधव ,मीनाक्षी मांडलिक,मंगला भरीतकर अश्विनीताई सूर्यवंशी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !