शंभुराजेंच्या जन्मोत्सवानिमित्त रामशेज गडावर भरगच्च कार्यक्रम! छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराची घोषणा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शंभुराजेंच्या जन्मोत्सवानिमित्त रामशेज गडावर भरगच्च कार्यक्रम
छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराची घोषणा
नाशिक::-छत्रपती फाउंडेशन आयोजित अजिंक्य किल्ला रामशेज महोत्सव,छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने किल्ले रामशेज येथे  दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले असल्याची माहीती मुख्य प्रवर्तक तथा स्वागताध्यक्ष   गणेश कदम यांनी दिली.   सोमवार दि.१३ मे रोजी सायं.६ वा.या जध्कामोत्र्यसव सोहळ्याला प्रारंभ होणार असून शिवभक्तांशी संवाद साधला जाणार आहे.राञी दहा वाजता आशेवाडीच्या पायथ्यापासून निघालेली  रामशेज गड मशाल ज्योत रॕली किल्ले रामशेज गडावर विसावा घेणार आहे. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला  गडावर आतिषबाजी करून छ.संभाजी राजे यांच्या जन्मक्षणाचा आनंद द्विगुणीत करण्यात येईल.
मंगळवार दि.१४ मे रोजी सकाळी ९ वा.ध्वजारोहण संपन्न करून आशेवाडी चौक ते रामशेज पायथा मार्गावर पुणेरी ढोल वाद्यांच्या गजरात स.९.३० वा.पालखी सोहळा,स.१० वा.बाळासाहेब वायतोंडे यांचे शस्रकल प्रात्यक्षिके ,१०.३०वा.शाहीर स्वप्निल डुंबरे यांचे पोवाडा गायन,११ वा.पोवाडे ,दुर्ग गीत गायनासह शंभुराजेंचे पुजन,१२ वा.छञपती संभाजी महाराज पुरस्कार वितरण सोहळा  दु.३ वा.शिवभोजन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
          या वेळी पत्रकारांना किल्ले रामशेज उत्सव आणि छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवाच्या दिनांक १३ व १४ मे २०१९ रोजी होणाऱ्या भव्यदिव्य कार्यक्रमाची रूपरेषा संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा विषयी समितीच्या वतीने माहिती दिली जाणार आहे
          तसेच छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कारासाठी सामाजिक,राजकीय,कला,क्रीडा,कृषी,उद्योजक,प्रशासकीय वैदकिय,आणि शिक्षण,करियर अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक हित जपणाऱ्या मान्यवरांच्या आणि गडकोट संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायत आणि काही ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे अशा मान्यवर,संस्थेचा नावांची घोषणा आज पत्रकार परिषदेमध्ये स्वागताध्यक्ष गणेश कदम आणि पदाधिकारी करणार आहेत.
असे आहेत यंदाचे छत्रपती पुरस्काराचे मानकरी
आ.डाॕ,राहुल आहेर, विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा, प्रेस  कामगार नेते जगदिश गोडसे,महाराष्ट्र कायगार सेनेच्या सरचिटणीस श्रीमती नंदाताई भोसले,अभिनेता अभिजीत खांडकेकर व किरण भालेराव,गणेश शैक्षणिक संस्थेचे दत्ताञय धाञक,सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे,आंतरराष्ट्रीय न्कानयनपटू दत्तू भोकनळ,आर्ट आॕफ लिव्हिंगचे विजय हाके,देवांग जानी,डाॕ.बी.एस ,निरगुडे,गडकोट संवर्धक राम खुर्दळ,सुर्या करिअर अॕकेडमीचे तुषार कैचे,समीर काकड,शाहीर स्वप्नील डुंबरे,बाळासाहेब वायतोंडे यांच्यासह आशेवाडी.,पिंपळनारे ,रासेगाव ,आक्राळे,मानोरी,ढकांबे,तुंगळदरा,गवळवाडी ग्रामपंचायत.
            
*

Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!