महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे ! पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी ९५०० वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत पाच वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.                                       
शीतल सांगळे यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून या शाळेत गोरगरिब कुटूंबातील नाशिक शहरातील मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची कौटूंबिक आर्थीक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने या मुलींना शैक्षणिक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकामी औषध निर्माण अधिकारी संघटना पुढाकार घेत असून या उपक्रमात सातत्य ठेवत असल्याबददल औषध निर्माण अधिकारी संघटनेचे पदाधिकारी एफ.टी.खान, हेमंत राजभोज, विजय देवरे व जनार्दन सानप यांचे विशेष अभिनंदन केले. दैनंदिन जीवनात काम करत असतांना प्रत्येक व्यक्तीने दातृत्व भावना ठेवल्यास आपणास आत्मिक समाधान लाभते. शासकीय कन्या शाळेसाठी दातृत्व भावना श्री.प्रदिप राठी यांनी जोपासून आमच्या शासकिय कन्या विद्यालयातील मुलींसाठी खुप मोठे योगदान देत असल्याचे असल्याने राठी यांना धन्यवाद दिलेत.
शासकिय कन्या विद्यालयास कर्मचारी वृंदासह आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे प्रतिपादन अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक  डॉ. साळुंके यांनी करुन प्रास्ताविकात त्यांनी शाळेचा पुर्व इतिहास नमुद करुन शाळेत शिक्षण घेतलेल्या महान व्यक्तींचा गौरवोदगार केला. शासकिय कन्या शाळेतून  मोठया प्रमाणात मुलींना शिक्षण घेऊन बऱ्याचशा मुली देश विदेशात मोठया पदावर कार्यरत असल्याचे नमुद केले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात नमुद केली.शाळेत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल ७३.३३ टक्के लागलेला असून कुमारी  आचल केशवचंद ओसवाल या विद्यार्थीनीस ८५.२० टक्के गुण मिळाल्याचे सांगितले.  शाळेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम, व्दितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यींनींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
औषध निर्माण अधिकारी संघटनेचे सल्लागार जी.पी.खैरनार यांनी आपले मनोगतात जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत प्रशासनास आवाहन केले. तसेच सामाजिक बांधिलकी उपक्रमातुन शालेय अभ्यासक्रमाच्या वहया मोफत वाटपाचा कार्यक्रम अविरत पणे चालु ठेवण्याबाबत ग्वाही दिली. अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा पवार, यांनी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुली या खरोखरच सावित्रीच्या लेकी असून सावित्रीबाई फुलेंमुळेच आपण याठिकाणी शिक्षण घेऊ शकत असल्याचे नमुद केले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे आपल्यासाठी खुली करुन दिली नसती तर आपण आजही अशिक्षीतच राहिलो असतो, असे नमुद करुन सभापती पवार, म्हणाल्या की, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नामदार सांगळे व मी केवळ सावित्रीबाई फुले यांचेमुळेच उच्च पदस्थ पदाधिकारी म्हणून आपल्या समोर बोलू शकत आहोत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणाल्या की, शासकिय कन्या विद्यालय ही आमच्या जिल्हा परिषदेची मातृसंस्था असून या संस्थेसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याकामी तत्पर असल्याचे नमुद केले. तसेच शासकिय कन्या विद्यालयाचे शिक्षकांची पदे भरण्याबाबत तात्काळ प्राधान्याने कार्यवाही करु असे आश्वासीत केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप राठी, शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य सचिन मालेगांवकर, महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे, जिल्हाध्यक्ष एफ.टी.खान, कार्याध्यक्ष हेमंत राजभोज, दिलीप बच्छाव, जनार्दन सानप, उमेश भावसार, प्रेमानंद गोसावी, किशोरकुमार गव्हाळे, प्रशांत कदम,  व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  शाळेच्या शिक्षीका श्रीम. कविता साठे यांनी तर संगिता सोनार यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!