कोविड-१९ वर मात केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नाशिक  : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.  आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी निफाड, येवला, चांदवड  व मनमाड येथे भेट देवून त्यांनी कोरोनाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. मनमाड येथील कोव्हीड-१९ केअर सेंटरला भेट देवून कोव्हीड आजारातून बरे झालेल्या ९ रुग्णांचे लीना बनसोड यांनी गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. आजारातून बरे झाल्याने या रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांना आठवडयातून दोनदा भेट देऊन तापाची तसेच रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
       ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध् उपाययोजना करण्यात येत आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ८ ठिकाणी जिल्हास्तरावरून संपर्क अधिका-यांची नियुक्ती करुन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या,  अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.
       येवला व मनमाड येथे ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांच्या समवेत येवला व मनमाड येथे भेट दिली. येवला येथे गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांच्या उपस्थितीत खातेप्रमुखांची बैठक घेवून कोरोना बाबत सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील कोव्हीड-१९ केअर सेंटरला भेट देवून कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कोरोना आजारावर मात केलेल्या ९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनमाड येथील कोव्हीड-१९ केअर सेंटरबाबत रुग्णांनी अनुभव सांगत अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार व काळजी घेतल्यामुळे आम्ही आजारातून बरे झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
याप्रसंगी नांदगाव येथील गटविकास अधिकारी गणेश चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ नरवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ ससाणे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मेनकर, तहसीलदार कुलकर्णी, केअर सेंटरचे प्रमुख डॉ. जगताप आदि उपस्थित होते. यानंतर उप जिल्हा रुग्णालय मनमाड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेऊन विविध सूचना दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!