पोस्ट्स

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

इमेज
राडा’ इव्हेंट: नाशिकमध्ये खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम युवांमध्ये उतुंग उत्साह! नाशिक ::-  नोव्हेंबरला नाशिकमध्ये आयोजित झालेल्या ‘राडा’ इव्हेंटने शहरातील खेळ व प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक नवीन अध्याय घडवला. Metamorph MMA आणि Merakii Events and Gifting यांच्या संयुक्त विद्यमाने २४/७ फिटनेस जिम, बोधलेनगर, नाशिक येथे आयोजित या बहुउद्देशीय कार्यक्रमात १०० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. यामुळे प्रेक्षक आणि क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाची नवचेतना निर्माण झाली.             आजच्या काळात देशातील युवा—विशेषतः लहान मुले—मोबाइल फोन आणि ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या शारीरिक खेळांकडे असलेल्या ओढीत घट होत आहे. अशा परिस्थितीत, ‘राडा’ सारख्या रोमांचक क्रीडा स्पर्धांनी युवांमध्ये नवऊर्जा आणि जोश निर्माण केला. हा कार्यक्रम केवळ स्पर्धा न ठरता, तरुणांना आभासी जगातून बाहेर पडून घाम गाळण्यास, स्वतःमधील प्रतिभेला उजाळा देण्यास आणि तिला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्रेरक ठरला.       ...

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !

इमेज
नासिक::- जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दि.१३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना निमंत्रणे देण्यात येत आहेत. 

कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर

इमेज
कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर     नाशिक : युवकांचा शेतीतील सहभाग या विषयाला अनुसरून 'ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन' व  मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि' यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या १८ व्या आवृत्तीचे आयोजन दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात येत आहे.  युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी संशोधन या क्षेत्रात केलेल्या विशेष वाटचालीची दखल घेऊन ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार’ देऊन सन्मानित करणार आहोत. प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारासाठी डॉ. अरुण दत्तात्रय भगत {पुणे}, कानिफनाथ अण्णासाहेब बुरगुटे {उपले दुमाला, सोलापूर}, डॉ. सुचिता संजय भोसले {सातारा}, मुजम्मिल बेपारी {कोल्हापूर}, डॉ. श्रीधर निवास बन्ने {तासगाव, सांगली}, डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे {अकोला}, अभिषेक दिनकर दातीर {गणोरे, अहिल्यानगर}, डॉ. अमोल सुखदेव घाडगे {मुरडपु, बुलढाणा}, डॉ. महेश अप्पासाहेब आजबे {गांधेली, छत्रपती संभाजीवनगर }, श...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

इमेज
नाशिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान दिल्ली : दि. १७ ऑक्टोबर रोजी ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्याला गौरविण्यात आले. हा सन्मान मा. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला.            आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, या सामूहिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.           जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते.   ...

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

इमेज
आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’         मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी २० लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तसेच देवांशीच्या आईने तिला यकृत दिल्यानंतर भाग देवून तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.                        वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अक...

,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !

इमेज
"माझा अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत बायको किंवा मेव्हणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले खाजगी सचिव अडचणीत आणतात - "दिलखुलास" नितीन गडकरी (२६ मार्च २०२२) ,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नावाजलेले राजकीय पदाधिकारी यांना काहीही सोयरसुतक नसल्यासारखे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणुकांपूर्वी सर्वात मोठा सण दिपवाळीचा जवळच आलेला असताना विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्याची संधी दवडली जात आहे.  यांत सर्वच राजकारण्यांची मनोवृत्ती अशी असेलच यात दुमत असू शकते, काही याबाबत खूप जागरूकतेने कार्य करणारेही आहेत. सर्वच नव्हे पण त्यांचे चेले चपाटे ही काही कमी नाहीत, या "किटल्या" कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी आस्थापना, मोठमोठ्या खाजगी आस्थापना यांच्या कार्यालयात "खेट्या" का मारतात हा आता संशोधनाचा विषय उरलेला नाही, जे चालले आहे त्यातून सारं काही जनताजनार्धन उघड्या डोळ्यांनी पहात आहे. या "किटल्यांचा" प्रशास...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला !

इमेज
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला ! नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. या परिषदेस महाराष्ट्र व गोवा वकील परिषद सदस्य ॲड. जयंत जायभावे, नाशिक जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, सहसचिव ॲड.संजय गिते, ॲड.सोनाल गायकर, खजिनदार ॲड.कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.  नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थापना सन १८८५ मध्ये झाली. जुन्या दगडी इमारतीनंतर सन २००५ मध्ये न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली होती. मात्र खटले, वकील व न्यायाधीशांची संख्या वाढल्याने न्यायालयाच्या विस्ताराची आवश्यकता भासली. वकील संघाच्या पाठपुराव्य...

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

इमेज
लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल नाशिक::- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात १३ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत  जिल्ह्यातून एकूण १३ हजार २०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १२३ कोटी ८८ लाख  ८६ हजार ९६५ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले असून, एक चाळीस वर्षांपूर्वीचा दावा निकाली निघाला आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड   मोटार अपघात प्रकरणात २०१९ साली राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक मध्ये झालेल्या अपघात बसमधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये ९२ लाख इतकी नुक...

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !   नाशिक (साक्री-धुळे)::- तालुका कृषी अधिकारी मनसीराम तुळशीराम चौरे, तालुका कृषी कार्यालय साक्री व कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान रफिक शेख यांना ७०००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांच्या नावे मौजे पन्हाळी पाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जमा झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दोन्ही आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १००००/-  रुपयांची मागणी केली केल्याची तक्रार आज १ सप्टेंबर रोजी दूरध्वनी द्वारे दिली होती. सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी साक्री येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रार नोंदवून घेऊन सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तक्रार यांच्याकडे १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आलोसे एक व दोन यांनी तक्रारदार यांच्या...

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

इमेज
डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ....  (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत) रसायनशास्त्राच्या अनेक शब्दांमध्ये अतिशय उत्तम शब्द आहेत.. त्यामध्ये उत्प्रेरक असा शब्द देखील आहे. प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर यांची भूमिका नेहमीच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिक्षक म्हणून कॅटलिस्ट सारखी राहिलेली आहे. समाजात काही विशिष्ट लोकांचा ओरा Aura काही वेगळाच असतो त्यामध्ये बागलाण तालुक्यातील द्याने येथील भूमिपुत्र असलेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जसं पावसात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि पेरते व्हा  असा सल्ला देणारा चातक पक्षी प्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम कमी वयात प्राध्यापक  म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर हे नाव सर्वांना सुपरिचित आहे.  अभ्यास केंद्रित व्यक्तिमत्व असलेले प्रा. डॉ. कापडणीस सर यांचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत असलेले नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये यांना सुपरिचित आहे. एख...

सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !  नासिक (जळगाव)::- मनोज जगन्नाथ मोरे, सहायक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाचोरा उपविभाग २,म.रा. वि. वि.,कार्यालय, जळगाव ( वर्ग २) यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण ३ प्रकरणे तयार करून ऑनलाईन द्वारे आलोसे यांच्या कार्यालयात सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याचा मोबदला म्हणून  लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी काल लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती.  तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल व आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. पाचोरा २ कार्यालय येथे पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे प्रत्येकी ३००० प्रमाणे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टा...

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक (धुळे)::- शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे, पंचायत समिती धुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.        तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी आलोसे यांनी सदर शाळेस भेट दिली असता विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.    सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.   त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आल...

दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- जिल्हा परिषद अंतर्गत दिंडोरी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (वर्ग -१) योगेश नारायण घारे व कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव यांना काल २१६०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          तक्रारदार  हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी सावरपाडा, तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून २१६०००/- रुपये रकमेच्या लाचेची पंचा समक्ष आलोसे क्रमांक एक यांनी मागणी करून आलोसे क्रमांक दोन यांनी अनुक्रमांक एक यांचे  लाच मागणी व स्वीकारण्यास  प्रोत्साहन दिले आहे.     सदर लाचेची रक्कम  २१६०००/- रु. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दिंडोरी पंचायत समिती दिंडोरी कार्यालयात स्वीकारताना आलोसे क्रमांक एक यांना काल दि. ८ऑगस्ट २०२५ रो...

सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन

इमेज
सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन                                                                                                                  नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, योग्य निदान आणि तातडीचे वैद्यकीय उपचार याबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी यांना असणे आवश्यक आहे. यासाठी ICMR-NIRRCH मुंबई, ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र वणी, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने   वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १८ व १९ जुलै २०२५ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहि...

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच ! ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !           नासिक (जळगाव)::- तक्रारदाराकडून २३/०६/२०२५ रोजी आलेल्या तक्रारीची पंचांसमक्ष  पडताळणी केली असता मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसऱ्या हप्ता  मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा  हजाराची मागणी केली आहे.      रोजी तक्रारदार यांच्याकडून मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील लोकसेवक ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ  व मांडकी ता. भडगाव जि. जळगाव येथील रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.  ६०००/- रुपयांची मागणी करून तडजोड अंती ५०००/- रुपये पंचा समक्ष ५०००/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.         यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती व आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याब...

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !

इमेज
जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी ! नासिक::- जिल्ह्यात खरीप हंगामास नुकतीच सुरुवात झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी व त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी. सदर बिल पावती जपून ठेवावी. जो विक्रेता बियाणे एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत विक्री करत असेल, तसेच पक्के बिल देत नसेल त्याची तक्रार तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी, पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किंवा तक्रार निवारण कक्ष व्हाट्सअप क्रमांक ७८२१०३२४०८ यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.          नाशिक जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की कोणीही बियाणे निर्धारित एमआरपी पेक्षा जास्त दरात वि...

गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक (अहिल्या नगर)::- तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी (वर्ग -१) सुधाकर श्रीरंग मुंडे, पंचायत समिती राहुरी, अहिल्यानगर, यांच्या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी निलंबनाची कारवाई केली होती, त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता आलोसे यांनी १००००/- रुपये लाचेची स्वतः मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारलेली आहे.         या संदर्भात तोफखाना  पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक(धुळे)::- तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवे मौजे सोंडले, ता. जि. धुळे येथील शेतजमीन सुलवाडे जामफळ प्रकल्पात संपादित केल्याने तक्रारदार यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळणेकरिता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) धुळे यांचेकडे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकरिता तहसीलदार शिंदखेडा यांच्यामार्फतीने आलोसे छोटू पाटील, मंडळ अधिकारी भाग तामथरे ता.शिंदखेडा यांचेकडे देण्यात आला होता. तक्रारदार यांनी १८ जून रोजी आलोसे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु.लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची १९ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु लाचेची मागणी करून आज दि. २०जून रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून २०००/-रु लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहात प...

विश्व मराठी संमेलन नासिकला होणार ! संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम राबविणार !

इमेज
विश्व मराठी संमेलन नासिक मध्ये होणार ! संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम राबविणार ! मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारीची बैठक नाशिक::- नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.            जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनसंदर्भात  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होत...

नामांकित हॉस्पिटल चे डाॅक्टर, कॅशियर, व उपस्थित एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
नामांकित हॉस्पिटल चे डाॅक्टर, कॅशियर, व उपस्थित एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !  नासिक::- येथील नामको कॅन्सर हाॅस्पिटल च्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जहागिरदार,  कॅशियर महिला कर्मचारी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व डॉ . विशाखा यांच्या दालनात लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान उपस्थित महिला कर्मचारी गायत्री सोमवंशी या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात येत आहे.             तक्रारदार हे पिवळे रेशन कार्ड धारक असून त्यांची पत्नी यांचे नामको कॅन्सर हॉस्पिटल पेठ रोड नाशिक येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असून शस्त्रक्रिया व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी तक्रार दाखल होण्यापूर्वी ३ एप्रिल  २०२५ रोजी ३००००/- हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी ९०००/- हजार रुपये स्वीकारले आहे, त्यानंतर दिनांक ७ एप्रिल रोजी पडताळणी मागणी कारवाई दरम्यान २१०००/- हजार रुपयाची मागणी करून त्यापैकी ११०००/- हजार रुपये स्वीकारले म्हणून इलोसे यांचे विरुध्द पंचवटी ...