डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)
डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने .... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत) रसायनशास्त्राच्या अनेक शब्दांमध्ये अतिशय उत्तम शब्द आहेत.. त्यामध्ये उत्प्रेरक असा शब्द देखील आहे. प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर यांची भूमिका नेहमीच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिक्षक म्हणून कॅटलिस्ट सारखी राहिलेली आहे. समाजात काही विशिष्ट लोकांचा ओरा Aura काही वेगळाच असतो त्यामध्ये बागलाण तालुक्यातील द्याने येथील भूमिपुत्र असलेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जसं पावसात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि पेरते व्हा असा सल्ला देणारा चातक पक्षी प्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम कमी वयात प्राध्यापक म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. कैलास कापडणीस सर हे नाव सर्वांना सुपरिचित आहे. अभ्यास केंद्रित व्यक्तिमत्व असलेले प्रा. डॉ. कापडणीस सर यांचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत असलेले नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये यांना सुपरिचित आहे. एख...