आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे

आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे नेवासा जि.अहमदनगर : “आई हे सेवेचे, समर्पणाचे आणि वासल्याचे प्रतीक असते, आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ असून कर्तबगार लेकरे हेच आईचे खरे वैभव असते, लक्ष्मीबाई कानडे या मांगल्याचा मंत्र जपणाऱ्या आदर्श माता होत्या, त्यांच्या संस्कारातून घरदार समृद्ध झाले, आईचे मातृत्व हे मुलाबाळाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते.” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, व्याख्याते, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले. जेऊर हैबती ता.नेवासा येथे माजी जि.प.सदस्य तुकाराम शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीबाई कडूभाऊ कानडे यांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अंकुशराव कानडे, औरंगाबाद मनपाचे कनिष्ठ अभियंता शेषराव पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बन्शी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले की,” ‘सध्या अतिरेकी चंगळव...