२३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा" बघायला मिळणार !!

 २३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा"  बघायला मिळणार !!


       नाशिक ( प्रतिनिधी )- साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडीसह सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  'राडा' सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. पत्रकार परिषदेत अभिनेते मिलिंद गुणाजी,  आकाश शेट्टी, अभिनेत्री हीना पांचाळ या कलाकारांनी अशी माहिती दिली.

    राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी- तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड,  योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना विशेष ठेका धरायला लावले आहे. चित्रपटाची जशी सर्वत्र चर्चा सुरू आहे त्याहून अधिक चर्चा चित्रपटातील गाण्यांची सुरू आहे. चित्रपटात आपले सर्वांचे लाडके  गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांनी  धमाकेदार नृत्याचा आविष्कार गाण्यांत दाखविला आहे. चित्रपटातील गाणी स्वप्निल बांदोडकर, जसराज जोशी, बेला शेंडे, उर्मिला धनगर, मधुर शिंदे यांनी सुरबद्ध केली आहेत. चित्रपटातील गाणी जाफर सागर लिखित असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली आहे. गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !