अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !

अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !

      नासिक ( सुचेता बच्छाव)::- चांदशी येथील भूमिपुत्र मंडलिक परिवाराकडून त्यांच्या अलास्का हॉल मध्ये ५ दिवसीय राजयोग मेडिटेशन आयोजन गणपती उत्सवानिमित्त करण्यात आले.


      प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्था, गंगापूर रोड सेंटरच्या संचालिका आदरणीय मनीषा दिदी यांनी परिसरातील नागरिकांना संबोधित केले. सकारात्मक विचार कसे करायचे, संकल्पशक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाला चांगली दिशा कशी दाखवावी या बद्दल मार्गदर्शन केले.

         अध्यात्मिक मार्ग ज्ञानातून आपल्याला सामाजिक मुल्ये, नैतिक मुल्ये जोपासून पुन्हा एक मुल्यानिष्ठ समाज निर्माण करू शकतो. प्रसादाचे महत्व सांगताना त्यांनी शुद्ध आणि सात्विक शाकाहाराचे महत्व पटवून दिले.

       ध्यानधारणेच्या फायद्यांबद्दलही त्यांनी विश्लेषण केले. मेडिटेशन शिबिरात सुखद आणि सुखद अनुभव आल्याचे आणि आत्मिक शांती मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शांतीलाल भाई, किरण भाई, अशोक भाई , नंदलाल भाई, नानाभाई, सुचेता बच्छाव बहेन, सोनी बहेन यांनी सहयोग दिला. शरद मंडलिक यांनी जागा उपलब्ध करण्याबरोबरच अनुषांगिक सुविधांचे नियोजन करून नागरिकांसाठी चांगला आदर्श निर्माण केला. त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. सहकार्याबद्दल संस्थेकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!