समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !

समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !

        सिन्नर ( प्रतिनिधी) बौद्धिक संपदेबद्दल असलेला आत्मविश्वास, संस्कृती व आधुनिकता यांचा मेळ प्रगतीकडे नेतो. सुसंस्कार, सत्शील वर्तणूक आणि अंगभूत देशभक्ती हे ब्राह्मण समाजाचे विशेष गुण आहेत. त्यांची गुणात्मकता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचाही विकास साधता येईल असे प्रतिपादन नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक सुहास शुक्ल यांनी केले.

सिन्नर येथील सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या ३२ व्या गुणगौरव समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक एम.जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर, पी. एल. देशपांडे, ज्योतिषी संजय रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते. 
    या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तर, कला, क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी,  पारितोषिकांचे प्रायोजक योगिता व अभिलाष पंडित, तसेच सेवानिवृत्त व वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अतिथींच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. सिन्नर येथील समाज बांधवांच्या विकासात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करून शुक्ल यांनी पुढील वर्षीच्या गुणगौरवातील पारितोषिकांचे प्रायोजकत्व स्वीकारले. अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी सकारात्मक विचार, सामाजिक एकजूट यातून अडथळ्यांवर मात करावी. असे आवाहन करताना विकासासाठी समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. माधवी पंडित यांनी अतिथींचा परिचय करून दिला. न्यासाचे कार्याध्यक्ष राजेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक तर शंतनु व शरयू कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. शारदा महिला मंडळाने इशस्तवन सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सुरेश देशपांडे, शरद रत्नाकर, मालपाठक, धनंजय मुळे, दिलीप मालपाठक, उल्हास देशपांडे, उदय कुलकर्णी, प्रा. बर्वे, संजय भणगे,  आदींसह न्यासाचे विश्वस्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!