भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी शिक्षणातज्ञांचे मत !

भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी  शिक्षणातज्ञांचे मत !
वारली कला ही प्रभावी चित्रभाषा !

        नाशिक ( प्रतिनिधी )- युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर हे दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांनी वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी महाराष्ट्राची आदिवासी वारली कला जाणून घेतली. भिंतीवर केलेले चित्र व विविध रेखाटने, तारपा वाद्य बघून ते मोहित झाले.

वारली चित्रशैली ही प्रभावी चित्रभाषा असून त्यातील कथाविश्व जगाला कवेत घेणारे आहे असे त्यांनी नमूद केले. नव्या भारतीय शैक्षणिक धोरणात कलानिर्मितीला महत्वाचे स्थान असेल त्याचे स्वागत केले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले. सुचित्रा देवधर यांनी भारतीय संस्कृतीनुसार कुंकूमतिलक लावून त्यांचे औक्षणाने स्वागत केले. सुप्रिया देवधर हिने विविध चित्रांचा तपशीलवार आढावा घेतला. संजय देवधर यांनी शंकानिरसन करून वारली चित्रसृष्टीची सफर त्यांना घडवून आणली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !