पोस्ट्स

प्राजक्ता चौधरी ठरल्या 'नारी तू नारायणी रत्न' पुरस्कार विजेत्या ! साहित्यिक पत्रकारांचा विशेष सन्मान !!

इमेज
प्राजक्ता चौधरी ठरल्या 'नारी तू नारायणी रत्न' पुरस्कार विजेत्या साहित्यिक पत्रकारांचा विशेष सन्मान      मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'नारी तू नारायणी’ पर्व दोनच्या निमित्ताने सौंदर्यवतींचा शोध घेणारा शानदार सोहळा ठाणे यथील समारंभ लॉन्स येथे  आयोजित करण्यात आला होता. हेमा भट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या शो टॉपर ठरल्या डॉ. सुमाया रेश्मा तर फॅशन विश्वातील कल्पक आणि प्रयोगशीलतेसाठी लौकिक असलेल्या धनश्री शेंड्ये यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. 'नारी तू नारायणी’ रत्न प्राजक्ता चौधरी यांना प्रदान करण्यात आले तर, लाझरीन, विणू पाठक, प्रिया दर्शनी कलाल, सुमिता दहाड उपविजेत्या ठरल्या.              फॅशनबीझ आणि फिरोझ लेबलच्या माध्यमातून फॅशनविश्वात कल्पक आणि प्रयोगशील म्हणून ओळख असलेल्या तसेच भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या वस्त्रनिर्मितीत कार्यरत असलेल्या धनश्री शेंड्ये यांची उत्तम नृत्यांगना आणि कलावंत म्हणूनदेखील ओळख आहे. कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी यावेळी स्पर्धकांच्या कौशल्याचे कौतुक केले शिवाय त्यांचे या क्षेत्रातील भवितव्य उत्तम असल्याचेही

पर्यटन संचालनालयातर्फे पक्षी महोत्सव ! हौशी, जिज्ञासू, विद्यार्थी यांच्यासाठी पक्षी महोत्सव, पर्यटन महोत्सव, ग्रेप हार्वेस्टिंगची पर्वणी !!

इमेज
पर्यटन संचालनालयातर्फे  नांदूर मध्यमेश्वर पक्षी महोत्सव         नाशिक ( प्रतिनिधी ) :- विभागातील पर्यटन उपसंचालक कार्यालयातर्फे येत्या ५ व ६ मार्च रोजी नांदूर मध्यमेश्वर येथे पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पक्षी निरीक्षणासह  विविध उपक्रम होतील. याशिवाय विविध चर्चासत्रे होणार आहेत असे उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.           दि. ५ मार्च रोजी सकाळी सायकलवर नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर पक्षी - फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पक्षी महोत्सवाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ पक्षी निरीक्षक व अभ्यासक दत्ता उगांवकर यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. चर्चासत्रांमध्ये  ज्येष्ठ पक्षी निरीक्षक सतीश गोगटे, प्रशांत वाघ, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर आणि प्रा.डॉ. सुधाकर कुऱ्हाडे,  नाशिकच्या पक्षी मित्र मंडळाचे पदाधिकारी अनिल माळी, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या प्रतीक्षा कोठुळे, कृषी पर्यटन तज्ज्ञ हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या महोत्सवात फोटोग्राफी स्पर्धा होईल. चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यात शाले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हॉकी स्पर्धेचे आयोजन !

इमेज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हॉकी स्पर्धेचे आयोजन-पल्लवी धात्रक नाशिक२२ (जिमाका वृत्तसेवा)::-हॉकी खेळात खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रवारी २०२२ या कालावधीत हॉकी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी तसेच हॉकी खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.       प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, हॉकी स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेना, नाशिक विभाग,नाशिक व द हॉकी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत १६ वर्षाखालील वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. हॉकी स्पर्धेचे व निवासाचे ठिकाण विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी-हिरावाडी रोड, नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे.           हॉकी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सचिव, द हॉकी नाशिक अजीज सय्यद यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021929786 व क्रीडा मार्गदर

सुभाषित दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार जाहीर !

इमेज
सुभाषित दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार जाहीर !    नाशिक-(वार्ताहर) अक्षरमंच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नाशिकच्या सुभाषित या विनोदी दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार प्राप्त झाला आहे. अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी हे पुरस्कार जाहीर केले. स्पर्धेतील अक्षरगंध पुरस्कार सुभाष सबनीस संपादक असलेल्या सुभाषित दिवाळी अंकाबरोबरच वेदांतश्री, रयतेचा कैवारी चांगुलपणाची चळवळ, वयम्, ठाणे नागरीक, दिपोत्सव निर्धाराचा. कल्याण वैभव, डॉक्टरुग्णमित्र या दिवाळी अंकानाही अक्षरगंध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती 'अक्षरमंच'चे अध्यक्ष डॉ.योगेश जोशी आणि सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले.

अभिनेता कृष्णा मरकड दिसणार मुख्य खलनायकाच्या भूमिकेत !

इमेज
अभिनेता कृष्णा मरकड दिसणार मुख्य खलनायकाच्या भूमिकेत ! तनुश्री मुव्हीज प्रस्तुत, मराठी चित्रपट, " येडुआईच्या नावानं " १८ फेब्रुवारी ला " स्टार ५ लाईव " या ओटिटी चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.     नासिक::- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावातील दिग्दर्शक राज भालेराव व तनुश्री मुव्हिज निर्मित  "येडू आईच्या नावानं" चित्रपटात नासिकचा अभिनेता कृष्णा मरकड मुख्य खलनायकाच्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कृष्णा मरकड यांची ही भुमिका सर्वच प्रेक्षकांना खुप आवडली असुन प्रेक्षक त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. चित्रपटामध्ये कृष्णा मरकड, रणजीत रणदिवे, कल्पना भावसार यांसारखे व्यावसायिक कलाकार असुन सोबत शाहरुख पठाण, रश्मी जांभळे, स्वाती कदम, मिलिंद सोनवणे, प्रमुख भुमिकेत आहेत, चित्रिकरण कॅमेरामन संजय गायकवाडांनी व पोष्ट प्रोडक्शन नौशाद इनामदार आणि प्रमोद धोत्रे यांनी केलेले आहे.    या चित्रपटाचे कथानक  पार्वतीचे रुप असलेली प्राचीन येडेश्वरी देवी वर आधारित आहे. देवीची भक्ती आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम चित्रपटात पहावयास मिळणार आहे. सर्व प्रकारच्या प्रेक्षका

जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती ! खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांची यादी

इमेज
जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती ! 21 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीद्वारे पदस्थापना ! नाशिक : आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कनिष्ठ सहायक लिपिक या संवर्गातून वरिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गात २१ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी महिला, अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड आदी उपस्थित होते, या पदोन्नती प्रक्रियेसाठी वरिष्ठ सहाय्यक भास्कर कुंवर, मंगेश केदारे, प्रमोद ढोले, राहुल देवरे, कानिफ फडोळ, किशोर पवार, साईनाथ ठाकरे,जगदीश कर्डक, दत्तात्रय बेलेकर, प्रमोद जाधव आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटना व सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ व शाल देत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार व्यक्त केले. **********

शिक्षण संवेदनच्या राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित !

इमेज
शिक्षण संवेदनच्या राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित ! ( न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१)                         ठाणे / कल्याण( प्रतिनिधी)::-शिक्षण संवेदन मासिकाच्या १५ व्या  वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात  जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार २०२२ ने प्रा. प्रदीप वाघ आणि प्राचार्य डॉ. माधव गवई  ( संस्थापक-संपादक, शिक्षण संवेदन ) यांच्या हस्ते आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. कमल गवई , प्राचार्य  डॉ सुभाष कंदारे, डॉ. अर्पणा प्रभू, डॉ केशव जाधव, अँड दिलीप वाळूंज, विजयसिंह नाईक, राजेंद्र पगारे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.           महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि प्रतिभावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान यावेळी करण्यात आला.           जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार २०२२ ने सन्मानित केल्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री.आपासो.देवरे विद्यालयात लेझीम पथकासह शिवजयंती उत्साहात साजरी !

इमेज
श्री.आपासो.देवरे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी खोंडामळी(प्रतिनिधी)::- श्री.आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विदयालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दाखले देत रयतेच्या कल्याणासाठी झटणारा एकमेव राजाची गाथा स्पष्ट केली. विद्यार्थीनींनी लेझीम पथकाचे संचलन करून गावकऱ्यांचे लक्ष वेधले.    या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक एम.डी.नेरकर, वार.डी.बागुल, आर.एम.पाटील, एस.जी.पाटील, श्रीम.एम.आर.भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डी.बी.भारती यांनी केले. तसेच कार्यक्रमाला विखरण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी दिली वारली चित्रशैलीतज्ञ देवधर यांच्या निवासस्थानी भेट

इमेज
वारली चित्रकला हा मराठी मातीचा कलात्मक वारसा !            नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी वारली चित्रकला साधीसुधी, सहजसोपी असते. ही चित्रे बघताना आपल्याला सात्विक आनंद मिळतो. माझ्या मुलीच्या लग्नात वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविराज भांगरे यांनी सुंदर वारली चित्र रंगवले. त्यासाठी पारंपरिक झोपडी तयार करून घेतली. त्यातून मराठी मातीचा कलात्मक वारसा जोपासला. आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वारली कला जाणून घेत कलेचा आनंद घेतला. असा अनुभव विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी व्यक्त केला.    शनिवारी, छत्रपती शिवजयंतीच्या दिवशी सकाळी डॉ. बी. जी. शेखर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांचे स्वागत सौ. सुचित्रा देवधर  यांनी केले.  सुप्रिया देवधर हिने अलीकडेच भिंतीवर रंगवलेल्या वारली चित्राची माहिती दिली. संजय देवधर यांनी  विविध वारली चित्रे दाखवून त्यांची वारली चित्रसृष्टी व वारली आर्ट वर्ल्ड ही पुस्तके भेट दिली. शेखर साहेबांनी कलेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. लवकरच पोलिस कुटुंबीयांस

जिल्हाधिकारी यांचे अभिवादन !

इमेज
जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन !! नासिक:- जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मे. सूरज मांढरे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.