स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हॉकी स्पर्धेचे आयोजन !


स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त हॉकी स्पर्धेचे आयोजन-पल्लवी धात्रक

नाशिक२२ (जिमाका वृत्तसेवा)::-हॉकी खेळात खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रवारी २०२२ या कालावधीत हॉकी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी तसेच हॉकी खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
      प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, हॉकी स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेना, नाशिक विभाग,नाशिक व द हॉकी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत १६ वर्षाखालील वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. हॉकी स्पर्धेचे व निवासाचे ठिकाण विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी-हिरावाडी रोड, नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
          हॉकी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सचिव, द हॉकी नाशिक अजीज सय्यद यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9021929786 व क्रीडा मार्गदर्शक हॉकी श्रीमती सी एस उदार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9403735492 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !